संगणक हार्डवेअर म्हणजे काय – What is Computer Hardware In Marathi

 आज आपण हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार कोणते आहेत? या बद्दल माहिती घेऊयात. संगणकाचे मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण संगणकामध्ये जे अप्लिकेशन वापरतो ते आणि हार्डवेअर म्हणजे आपल्याला जे संगणकाचे भाग डोळ्याने दिसतात ते जसे स्क्रीन, माउस, cpu, प्रिंटर. आज आपण हार्डवेअरची माहिती (Information of Computer Hardware in Marathi) घेणार आहोत.what is hardware and types of hardware in marathi mahiti

     सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. कीबोर्ड आहे पण त्यात सॉफ्टवेअरच नाही मग कीबोर्ड चे बटन दाबून काही उपयोग काही लिहलेच जाणार नाही. माउस फिरून काय उपयोग जर स्क्रीन वर curser च दिसत नसेल. हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअर नसेल तर असेच होते. (Information of Computer Hardware in Marathi) चला आता संगणक हार्डवेअर बद्दल माहिती घेऊयात.

संगणक हार्डवेअर म्हणजे काय? (What is Computer Hardware in Marathi?)

    हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याला डोळ्याने दिसतात. ज्यांना आपण हाताने स्पर्श करू शकतो. हार्डवेअर म्हणजे संगणकाशी संबंधित भौतिक वस्तू ज्यात इनपुट आउटपुट उपकरणांचा समावेश होतो. संगणकामध्ये जे माहिती साठवणारी उपकरणे आहेत ते हार्डवेअर आहेत. हार्डवेअर नसल्यावर संगणकाचा काहीही उपयोग नाही. हार्डवेअरच नसल्यावर सॉफ्टवेअर टाकताच येत नाही.
   सॉफ्टवेअरला संगणकाचा आत्मा म्हणले जाते आणि हार्डवेअरला शरीर म्हणले जाते. समजा की तुम्हाला संगणकावर गाणे ऐकायचे आहे तर तुम्हाला माउस ची मदत घ्यावी लागते, तुम्ही स्क्रीन वर पाहता की कोणते गाणे ऐकायचे आहे त्यानुसार तुम्ही गाणे लावता. गाण्याचा आवाज ज्या साऊंड मधून येतो ते सुद्धा एक हार्डवेअरच आहे. हार्डवेअर म्हणजे काय हे तर तुम्हाला कळले असेल आता पाहुयात हार्डवेअरचे प्रकार कोणते आहेत.

संगणक हार्डवेअरचे प्रकार- (Types of Hardware in Marathi)

     संगणक हा दोन सिस्टिमच्या स्वरूपात असतो एक म्हणजे डेस्कटॉप आणि दुसरे लॅपटॉप. डेस्कटॉप मध्ये सगळे घटक वेगळे असतात. लॅपटॉप मध्ये सगळे घटक एकत्रितपणे जोडले असतात त्यांना कमी जागेत बसवलेले असते. चला हार्डवेअर चे काही प्रकार पाहुयात.

1) RAM-

     RAM चा फूल फॉर्म आहे “Random Access Memory”. रॅम संगणक हार्डवेअर चा एक प्रकार आहे त्याचा उपयोग माहिती साठवण्यासाठी आणि माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. रॅम मध्ये माहिती कायमस्वरूपी साठवून ठेवता येत नाही. रॅम थोड्या काळासाठी माहिती साठवू शकतो. तुम्ही फोन मध्ये recent हा पर्याय पहिला असेल त्यात आपण उगढलेले अँप्स काही काळासाठी तसेच चालू ठेवता येतात ते रॅम च्या मदतीने होते.

2) Hard Disc-

    हार्ड डिस्क हार्डवेअर चा दुसरा प्रकार आहे ज्याचा वापत माहिती साठवण्यासाठी केला जातो. पण हा रॅम पेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. हार्ड डिस्क मध्ये माहिती 
कायमस्वरूपी साठवून ठेवता येते. हार्ड डिस्क मध्ये इलेक्टरो मॅग्नेटिक पृष्ठभागाचा वापर केला जातो जो हार्ड डिस्क ला माहिती साठवण्यायोग्य बनवतो. हार्ड डिस्क मध्ये माहिती साठवण्याची क्षमता रॅम च्या तुलनेत जास्त असते.

3) Monitor-

    संगणक वापरताना ज्याच्या समोर तुम्ही बसतात मॉनिटर असते. मॉनिटर हार्डवेअर चा वापर आउटपुट दर्शवण्यासाठी होतो. मॉनिटर च्या स्क्रीन वर विडिओ, आणि ग्राफिक्स पाहता येते. विडिओ दर्शवण्यासाठी विडिओ कार्ड ची गरज असते. मॉनिटर टेलिव्हिजन सेट सारखाच असतो फक्त फरक एवढाच असतो की मॉनिटर मध्ये रेसोल्युशन आणि ग्राफिक्स जास्त असतो.

4) CPU- 

     CPU चा फुल फॉर्म होतो “Central Processing Unit”. CPU हा संगणक प्रणालीचा मुख्य हार्डवेअर भाग आहे ज्याचा उपयोग संगणकाच्या इतर भाग म्हणजेच सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा वापर करून बहुतेक आदेशांचा स्पष्टीकरण आणि अंमलबजावणीसाठी केला जातो. CPU ला संगणकाचा मेंदू सुद्धा म्हणले जाते. CPU ला मॉनिटर, कीबोर्ड, प्रिंटर असे बाकीचे हार्डवेअर जोडलेले असतात. 

5) Mouse-

     माउस हाताने वापरायचे हार्डवेअर आहे त्याचा उपयोग स्क्रीन वर काहीतरी दर्शवण्यासाठी केला जातो. माउस वायरचा असू शकतो किंवा वायरलेस असू शकतो. आपल्याला स्क्रीन वर जो एक छोटासा बाण दिसतो तो माउस च्या साहाय्याने नियंत्रित केला जातो. 

6) Keyboard- 

     कीबोर्ड हा हार्डवेअर हार्डवेअर चा एक प्रकार आहे याचा उपयोग टायपिंग करण्यासाठी केला जातो. माऊस प्रमाणे कीबोर्ड वायरचा किंवा वायरलेस सुद्धा असू शकतो. कीबोर्ड वर संख्या, अक्षरे, आणि चिन्हे लिहलेले असतात. त्या चिन्हावरचे बटण दाबल्यावर ते स्क्रीन वर टाइप होते. 

     मला आशा आहे की तुम्हाला हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार या विषयावर पूर्ण माहिती मिळाली असेल. जर माझ्याकडून जर काही राहिले असेल तर कंमेंट करून सांगा. पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत पाठवणे विसरू नका. तंत्रज्ञानाशी संबंधित माहितीसाठी माझ्या या ब्लॉगला वारंवार भेट देत रहा.
धन्यवाद!

1 thought on “संगणक हार्डवेअर म्हणजे काय – What is Computer Hardware In Marathi”

Leave a Comment

en_USEnglish