टिप्स…. १) पोहे,उपमा,शिरा थंड झालेले असतील तर मस्त कुकर ला थोडेसे पाणी घालून एक शिट्टी काढली की मऊ लुसलुशीत अगदी ताजे केल्यासारखे गरमागरम होतात ….. २)हरभरा डाळ दोन तास पाण्यात भिजवून नंतर सूती कापडाने पुसून कोरडी करून तव्यावर तेल घालून खमंग भाजून मीठ हळद घालून थोडा खाण्याचा सोडा घालावा अगदी कुरकुरीत डाळ तयार होते…. ३) पालक पुरी हिरवीगार राहण्यासाठी पालक स्वच्छ धुवून पुसून नंतर त्यात थोडे दूध घालून मिक्सर वर बारीक करून घ्यावा त्यात बसेल असे पीठ मळून घ्यावे ४) पुऱ्या करतांना कणीक मळतांना थोडीशी साखर घालावी पुऱ्या फुगलेल्या तशाच राहतात ….. ५)भाज्या करतांना फोडणीचे तेल उडू नये म्हणून फोडणी करतांना गॅस कमी करावा…. ६) तिखट मसाला डबा भरतांना डब्याच्या तळाशी पेपर घालावा म्हणजे डबा स्वच्छ राहतो…. ७) तूर डाळ वरण करतांना कुकरला डाळी मध्ये शिजवताना थोडेसे मेथी दाणे, थोडे जिरे आणि साजूक तूप घालून शिजवून घ्यावे चवदार लागते ….
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.