जपान मध्ये सार्वजनिक बस चालकांनी अनोख्या प्रकारे संप केला होता

सार्वजनिक बस चालकांनी अनोख्या प्रकारे संप केला होता. त्याबद्दल नुकताच वाचनात आलं. आता सध्या आपल्याकडे चालू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपापुढे, या परदेशी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप नक्कीच वेगळा आणि जास्त प्रभावी वाटला म्हणूनच येथे देत आहे. त्यांनी संप पुकारला पण काम थांबवले नाही. त्यामुळे जनतेला बिलकुल त्रास झाला नाही. याउलट त्यांनी लोकांकडून तिकिटाचे पैसे घेण्यास नकार दिला. आणि संपकाळात चक्क फ्री बस सेवा दिली. यामुळे इंधनाचा अतिरिक्त खर्च आणि शून्य उत्पन्न अशा दुहेरी कात्रीत बस कंपनी व्यवस्थापन अडकले. अशा प्रकारच्या संपामुळे सामान्य जनतेच्या मतांचं पारडं आपोआप कर्मचाऱ्यांच्या बाजूने झुकले. मला ही असहकाराची अतिशय प्रभावी युक्ती खूपच आवडली. Public opinion very powerful. ते जिंकलं तर भल्याभल्या संकटांवर मात करता येते. आणि स्वतःचं नुकसान करेल अशा संपाचा काय फायदा ? वहा मारो जहाँ सबसे जादा दर्द होगा !! असा प्रकार आपल्याकडे झाल्याचे ऐकिवात आहे का ? या पद्धतीबद्दल कायदेशीर बाबी जाणून घ्यायला आवडतील. आणि एकंदर या युक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं??

Leave a Comment

en_USEnglish