समधीर जुगत पाणी मुक्त हळद कुंकू कालवाज्यात एकविरावर तेलन पडे सप्तशृंगीले बलावझ्यात (देवीचे नाव बोलणे)।।2।। . * चुल्यावर * चुला म्हणे मी चूल देव चुला चंदन कपाटी।। आन शिजे सव्वा खंडी।। बयतन बये गाडा गणती। लोके जेवती लाखो पती। नवरदेव ना बाप दुनियादारी।। चारी पंगती दिन्यात भारी ।। अखंड तुपण्या लायात धारी।। *दिव्यावर* दिवा म्हणे मी दीव लाया दिवा निज भयना कोठे।। गाव समदिरण्या काटे।। आरे तू शिवलाया रे भाऊ।। सांग तुन दिवा लावण मोल। एक लाख सव्वा लिसु।। सव्वा नाही पण लाख दिसू।। दिवा सोबनले लिसु।। ली तो नवरदेव ना बाप।। दिवाले नऊ मन तेल।। दवाले आसमणी वात।। दिवा मांडव दारी लावा।। दिवा बये सारी रात ।। उजड पडे लख लखात।। या वहराडी वापरती।। कला बुध झटकती।। *दारण*