उन्हाळयात लिंबू सरबत आरोग्यासाठी लिंबाचा फार उर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होवून चवहीन होतात. त्यासाठी लिंबूना निट धूवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रिजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहातात. *टमाटरचा पल्प पटकन् काढण्यासाठी*- टमाटरचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन् काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेवी व ज्युस साठी करता येतो. *इडली नरम,मुलायम बनविण्याकरीता*- इडली नरम, मुलायम बनविण्याकरिता इडलीच्या पिठामध्ये एक लहान चमचव्हिनेगर घालावे. त्यामुळे इडली अतिशय नरम बनते. *लाल ५) टोमॅटो सार करतांना त्यामध्ये गाजराच्या फोडी घालाव्या ,सार घट्ट होते… ६) थोड्या तुपावर रवा टाकून भाजून ठेवावा, कीड लागत नाही… १) दुधावरची साय काढून त्यामध्ये दही छान मिसळून घ्यावे २)गव्हाचे गव्हल्याना कुकर मध्ये एक वाफ द्यावी.ते मऊ होतात ..त्यानंतर उकळत्या दुधात ते टाकल्यास गोळा न होता ..उत्तम खीर होते.. ३) साखरेचा पाक छान होण्यासाठी त्यात थोडे लिंबू दोन थेंब पिळावे….म्हणजे पाक पातेल्याला चिकटून राहत नाही…. ४) तळतांना कढईत तेलात थोडे मीठ घालावे…तेल कमी लागते…. ५)शेंगदाणे भाजून झाले की त्याची साल जर लवकर काढायची असेल तर सुती पिशवीत शेंगदाणे घालून ३,४ वेळा पिशवी आपटावी…आपोआप विनासायास साल निघून येतात…. १) कोथिंबीर आणल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी निवडावी. मग एक प्लॅस्टिकचा आडवा डबा घेऊन त्यात एखादे मोठ्या रूमालाइतके सूती/कॉटनचे कापड ठेवून त्यात ही निवडलेली कोथिंबीर ठेवली व त्याच कापडाच्या टोकांनी झाकली आणि मग डब्याचे झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवले असता बरेच दिवस ताजी रहते. फक्त जेव्हा जेव्हा कोथिंबीर घेण्यासाठी डबा उघडू त्यावेळी जर एखादे खराब झालेले पान दिसले तर ते लगेच काढून टाकायचे. १) पातळ पोह्यांचा चिवडा करतांना पोहे थोडे उन्हात ठेवावे.. नाहीतर मंद आचेवर भाजताना किंचित मीठ घातल्यास ते आकसत नाहीत…. २)भाजीमध्ये तेल जास्त झाल्यास त्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात, तेल शोषले जाते… ३)टोमॅटो सार किंवा रस्सा भाजीला दाटसर पणा येण्यासाठी अर्धा उकडलेला बटाटा कुस्करून बारीक करून घालावा… ४) मोदकाची उकड काढतांना अर्धे पाणी अर्धे दूध घालावे मोदक पांढरे शुभ्र व मऊ राहतात… ५)कॉफी मध्ये जायफळ ऐवजी वेलदोडे पूड घालावी.. छान स्वाद येतो…. साबुदाणा वडा करताना, त्यात दोन टेबलस्पून उपवासाची भाजणी घालावी. म्हणजे वडे नरम पडत नाही व कुरकुरीत होतात. टिप नंबर… 2 कढीगोळे करताना मीठ आयत्यावेळी मिक्स करावे. आधी जर मीठ डाळींमध्ये मिक्स केले, तर त्याला पाणी सुटते व मिश्रण पातळ होऊन गोळे कढी मध्ये फुटतात. बरेचदा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो. असं होऊ नये म्हणून पराठ्याची कणीक मळताना ती मऊ असावी आणि पराठा लाटताना मधोमध प्रे

Leave a Comment

en_USEnglish