चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी. त्वचेच्या देखभालिकडे दुर्लक्ष केल्याने .कित्येकदा आपल्या चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर साबण वापरणं बंद करा. याऐवजी उटण्याचा उपयोग करा. उटण्याचा साठी लागणारे साहित्य. एक चमचा चंदन पावडर ,अर्धा चमचा हळद, दोन चमचे दूध,दोन चमचे बेसन, वरील सगळे साहित्य एका प्लेट मध्ये एकत्र करा आणि त्यामध्ये थोडे गुलाब पाणी टाका.हे उटणे तुम्ही आपल्या चेहऱ्याव्यतिरिक्त संपूर्ण शरीरावरही लावू शकता. सुंदर व नितळ त्वचेसाठी घरगुती फेसपॅक. एक चमचा हळद, एक चमचा बेसन, एक चमचा कॉपी पावडर, एक चमचा मध, आणि एक चमचा दही, वरील सर्व साहित्य एकत्र करा.