–4 महिने उन्हाळ्यात थंड पेय प्रमाणात सेवन करा*
१)लाजामण्ड:- म्हणजे लाह्यांचे पाणी. साळीच्या लाह्या उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ ठेवून नंतर कुस्करून गाळून त्या पाण्यात चवीपुरते मीठ आणि साखर घालून प्यावे. हे पाणी तहान घालविणारे, भूक वाढविणारे, पचण्यास अगदी हलके, शरीराचे पोषण करणारे, साम्य टिकवून ठेवणारे, सर्व ऋतुंमध्ये पिण्यास उत्तम, शरीराची आग, ताप, चक्कर येणे यांवर प्रभावी आणि विशेष म्हणजे लहान मुले, म्हातारे लोक, स्त्रिया, नाजूक व्यक्तींसाठी जास्त चांगले
. २)धन्याचे पेय:- थंड पाण्यात धनेपूड, कापूर, लवंग, वेलची, मिरे आणि साखर घालून ते ढवळून प्यावे. ते पित्त कमी करणारे, जिभेला चव देणारे असते.
३)मनुकांचे पेय:- मनुका गरम पाण्यात भिजवून, काही काळ ठेवून नंतर कुस्करून गाळून ते पाणी प्यावे. ते थकवा घालविणारे, तहान, चक्कर, शरीराची आग कमी करणारे पण पचायला जड असते.
४)खर्जूरादि मंथ:- खजूर, डाळिंब, मनुका, चिंच, आवळा, फालसा हे सर्व पाण्यात एकत्र भिजत ठेवून थोड्या वेळाने रवीने घुसळून, गाळून प्यावे. गोड- आंबट चवीचे, अतिमद्यपानाने होणारे त्रास, शरीराची आग इ. साठी उपयुक्त, शरीराला पोषक, ताकद देणारे होय.
५)पियुष साहित्य :- सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस ,दहा चमचे साखर ,छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ. कृती :- दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे. लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्याच वेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.
६)फळांचे सरबत साहित्य:- १ अननस , २ संत्री, २ मोसंबी, २ निंबू कृती:- सर्वांचा रस काढून मोजावा. रसाच्या दीडपट साखर घेऊन त्यात थोडे पाणी घालून पाक करून घ्यावा. थंड झाल्यावर वरील रस बॉटल मध्ये भरावा. तो १५ ते २० दिवस सहज टिकतो. आयते वेळी थंड पाण्यात घालून सरबत घेता येते, त्यात किंचित मीठ घातले तरी चालेल.
७)खस सरबत :- साखर व पाणी एकत्रित करून गरम करा त्यास चांगली उकळी येऊ द्या, थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात खस इंसेस व रंग घाला पाहिजे तेव्हा थंड पाण्यात सरबत घालून प्या.
८)अननसाची लस्सी साहित्य :- ताक किंवा दही, अननसाचे तुकडे, विलाईचि पूड. किंचित साखर कृती :- अननसाचा रस काढून सर्व एकत्रित करून मिक्सर काढा,त्यात बर्फ घालून ग्लास मध्ये लस्सी द्या, त्याला छान सुगंध येतो .
९)चिंचेचे सरबत:- वाळलेली चिंच घ्यावी त्यांतील चिंचोके काढून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावी. काही वेळाने चिंच कुस्करून घ्यावी व चिंच काढून घ्यावी.चिंचेच्या पाण्यात साखर,मीठ, सोप व जिरे पूड टाकावी व बर्फ टाकून पिण्यास द्यावे.
१०)टोमाटो व काकडी साहित्य -: तीन कप टोमाटोचा ज्यूस दन चमचे लिंबाचा रस,दोन लवंगा एक दालचिनी काडी, एक लहान कांदा किसून, अर्धा कप काकडीचा कीस, चवीपुरते मीठ, तीन चमचे साखर व बर्फाचे क्युब्ज . कृती -: कांदा व काकडी किसून घ्यावी, व्र्फ सोडून सर्व घटक पदार्थ एकत्र करून फ्रीज मध्ये एकतास भर ठेवावेंन्त्र गाळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून प्रत्येक ग्लासात घालून बर्फाचा क्युब्ज धालाव्यात व हे मिश्रण ओतावे.
११)कलिंगडचे सरबत साहित्य -: एक कलिंगड, चवीपुरते मीठ, दालचिनी/ मिरपूड , साखर एका लिंबाचा रस. कृती -: कलिंगड कापून त्याच्या लालबुंद मधल्या भागातील गर स्कुपने( गोल आकाराचा चमचा आईस्क्रीम काढण्याचा ) काढून ते गोळे एका बाउल मध्ये घालून फ्रीज मध्ये ठेवावे. आणि मग उरलेल्या कलिंगडचा लाल भाग अगदी बारीक चिरून त्याच्या बिया काढून त्याचा रस काढून तो गाळून घ्यावा. त्यात मीठ,साखर, दालचिनी पूड किंवा मिरपूड,लिंबाचा रस घालून तासभर फ्रीज मध्ये ठेऊन थंड करावे.सर्व्ह करतेवेळी प्रत्येक ग्लासात थंड सरबत काढून ठेवलेल्या कलिंगड च्या तुकड्यातील एक दोन तुकडे त्या सरबतात घालून प्यायला द्यावे. या सरबतात बर्फ क्यूब्ज घालू नये.
१२)सफरचंदा चे पेय साहित्य -: २५० ग्राम सफरचंद चवी पुरती साखर, एक लिंबू, मीठ. कृती -: स्वच्छ धुवून साला सकट बारीक चिरून घ्यावी. साखरेवर लिंबाची साल किसून घ्यावी. व ती सफरचंदात मिसळावी. तीन कप उकळीचे पाणी त्यातओतावे व झाकण घालून ठेवावे. थंड झाल्यावर गाळून घ्यावे.चवी पुरती साखर घालावी. मीठ रुची प्रमाणे घालावे किंवा नाही घातले तरी चालेल. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून बर्फ घालून लहान लहान ग्लासातून सर्व्ह करावे.
१३)जिंजरेल साहित्य-: एक किलो प्रत्येकी बेताच्या आकाराचा एक कप आल्याचा रस व लिंबाचा रस त्याच कपाने मोजून चार कप पाणी . कृती -: साखर व पाणी एकत्रित करून साखर पाण्यात चांगली मिसळू द्यावी. ते पानी पाच ते सात मिनिटे उकळावे. गार झाल्यावर आल्याचा रस व लिंबाचा रस गाळून व्यवस्थित मिसळावा. हे टिकाऊ करण्यासाठी दोन चमचे पाण्यात अर्धा चमचा पोट्यशियम मेटाबाय सल्फाईड गाळून ते मिश्रण त्या रसात मिसळावे. सर्व्ह करताना उंच ग्लासमध्ये दोन चमचे करड बर्फ व थोडा जिंजरेल सोडा किंवा पाणी गाळून द्यावे.
१४)कोरफड रस:- कोरफड रस चवीला तुरट असली तरी, या रसात डिहाइड्रेशन यासारख्या समस्यांना प्रतिकार करण्याची क्षमता अधिक असते. आपल्या शरीराला थंडावा देण्याव्यतिरिक्त कोरफड रस हा आपल्या त्वचेचा ग्लो कायम राखण्यास मदत करतो. कोरफडाच्या पानांचा गर काढताना, त्यावरील पिवळ्या रंगाचा थर काढुन टाका कारण यामुळे कोरफड रस हा कडवट होण्याची शक्यता असते. कोरफडचा पांढरा गर काढून घेतल्यावर, त्याला मिक्सरमध्ये चांगल्यापद्धतीने वाटुन घ्यावा. आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार चाट मसाला किंवा मीठ घालावे.
१५)दही शेक:- दहीमध्ये मीठ, जिरा पावडर आणि चवीनुसार हिंग घालून ब्लेंडरमध्ये चांगल्या पद्धतीने ब्लेंड करुन घ्या. नंतर यामध्ये बर्फ घालून या थंडगार पेयाचा आस्वाद घ्या. या दही शेकमुळे आपल्या पोटातील आग आणि पित्त दूर होते.
१६)अमरबेल सरबत:- अमरबेलाच सरबत उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देतो. सगळ्यात आधी अमरबेल मधील साऱ्या बिया काढून त्याला मिक्सरमध्ये चांगल्या पद्धतीने वाटून घ्या. त्यानंतर या ज्युसला चांगल्या पद्धतीने फिल्टर करुन घेऊन त्यामध्ये चाट मसाला घालून, अमरबेल पेयाचा आस्वाद घेण्यास तयार आहे.
१७)पुदिना सरबत:- पुदिन्याच सरबत हे ऊन्हाळ्यात आपल्या शरीराला डिहाइड्रेशन आणि लू पासुन वाचवतो, हे सरबत बनवताना सगळ्यात आधी मिक्सरमध्ये पुदीना, साखर, मध, काळ मीठ, मिरपूड आणि जीरा पावडर घालून चांगल्या पद्धतीने वाटुन घ्या. या तयार झालेल्या पेस्टला कमी मात्रा असलेल्या पाण्यात मिक्स करुन पुदिना पेयाचा आस्वाद घेण्यास तयार आहे.
१८)जलजीरा साहित्य- १ टेबलस्पून भाजलेल्या जिर्याची पावडर अर्धा टेबलस्पून पुदिन्याची पेस्ट अर्धा टेबलस्पून कोथिंबीरीची पेस्ट १ टीस्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून काळं मीठ अर्धा टीस्पून साखर अर्ध्या लिंबाचा रस १ ग्लास थंड पाणी चवीपुरते मीठ कृती : गार पाण्यात सारे साहित्य एकत्र करून घ्या.त्यानंतर मिश्रण ढवळून घ्या.सजावटीसाठी त्यात थोडी कोथिंबीर व पुदीना टाका.गारेगार जलजीराचा आस्वाद घ्या.
१९)पंजाबी लस्सी साहित्य:- ताजे घट्ट दही – २ १/२ कपसाखर १/२ कपबर्फाचे तुकडे गरजेनुसारदूध – १/२ कपताजे दूधक्रीम २ चम्मचविलायची व सुका मेवा कृती:- -दही आणि साखर चांगल्या प्रकारे मिळवून घ्या. -मिक्सरच्या पॉट मध्ये हे मिश्रण टाकून त्यात बर्फाचे तुकडे टाका. -त्यात दुध व दुधक्रीम टाका. -विलायची बारीक करून टाका -मिक्सर फिटवून मिश्रण एकजीव होऊ द्या. -ग्लास मध्ये काढून त्यावर दुधाचे क्रीम व सुका मेवा बारीक करून टाका. थंड लस्सी तयार आहे. टिप्स:- दही व दूध ताजे असावे.लस्सी बनविताना ताजे पदार्थच वापरावे.दही व इतर पदार्थ चांगल्याप्रकारे मिळविण्यासाठी मिक्सरचा वापर करावा.घट्टपणा कमी करण्यासाठी जास्त बर्फ किंवा पाणी घाला.लस्सीमध्ये केसराचा वापर अधिक स्वाद व रंगासाठी करता येतो.लस्सीमध्ये वाटेल तितके दूध क्रीम टाका.दूधक्रीम चांगल्या प्रतीचे व त्यास फेटू नये.
२०)कैरीचे पन्हे प्रकार १ साहित्य : ५०० ग्रॅम कैऱ्या साखर १ चमचा मीठ कृती : कैरीची साले काढून त्या अख्ख्या किंवा फोडी करून स्टीलचा भांड्यातून कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर कैरीचा गर व साखर मिक्सरमधून अथवा पुरणयंत्रामधून काढावा. जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घातली तर ते व्यवस्थित गोड होते व हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते. पन्हे करताना थोड्या गरात थंड पाणी व किंचित मीठ घालावे. याची चव फारच छान लागते.
२१)कैरीचे पन्हे प्रकार २ साहित्य : ५०० ग्रॅम कैऱ्या मीठ गूळ वेलची पूड चवीप्रमाणे कृती : वर दिल्याप्रमाणे कैरी शिजवून घ्यावी. मिक्सर अथवा पुरणयंत्रातून काढल्यानंतर त्यात मीठ व गूळ चवीनुसार घालून मिश्रण सारखे करावे. चवीपुरती वेलची पूड घालावी. देताना थोड्या गरात पाणी घालून द्यावे.
२२)कैरीचे पन्हे प्रकार ३ ५०० ग्रॅम कैऱ्या मीठ साखर चवीप्रमाणे वेलची पूड कृती : कैरीचे साल काढून ती किसून घ्यावी. नंतर थंड पाण्यात हा कीस टाकून तो कुस्करून घ्यावा. नंतर त्यात अंदाजाने मीठ व साखर घालावी. गाळण्यातून गाळून घ्यावे व नंतर त्यात वेलची पूड टाकावी. हे पन्हे आयत्यावेळी करता येते.
२३)कैरीचे पन्हे प्रकार ४ साहित्य : ५०० ग्रॅम कैऱ्या चवीप्रमाणे साखर मीठ१ चमचा केशरी रंग वेलची पूड चुरा केलेला बर्फ कृती : शिजवलेली कैरी व साखर यांचे मिश्रण घेऊन त्यात थोडा केशरी रंग, वेलची पूड, थंडगार पाणी, चवीप्रमाणे मीठ व बर्फ एकत्र करावे. व्यवस्थित ढवळून सर्व्ह करावे.