मित्रानो या धावपढीचा जगात आपण आपल्या आरोग्य कडे लक्ष देणे विसरत चालतोय .आम्ही आपल्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलोय .
महिलांचे खरे सौन्दर्य हे तिच्या केसात असत , केसांची निगा कशी राखावी याची पूर्ण माहिती आम्ही देणार आहोत ..
* केसाचे सौंदर्य :-
१) सध्याच्या धावत्या जीवनशैलीमुळे अशा कितीतरी महिला आहेत , त्यांना आपल्या केसांची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही . त्यामुळे कितीही सुंदर केस असले तरी त्याची काळजी न घेतल्या मुळे त्यांचा केसांचे सौंदर्य टिकून राहत नाही . घनदाट आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी योग्य आहार आणि योग्य काळजी घेणे गरजेचे आहे
२) तेल लावणे :-केसं मध्ये जवळपास १ तास तेल मुरले पाहिजे , त्यामुळे केसांचा मुळापर्यंत तेल जाते . डोक्यावर कोमट तेलाने मालिश करावी आणि गरम पाण्यातून काढलेल्या टॉवेलने डोके झाकून घ्यावे . त्यामुळे केसांना वाफ मिळते .कोणत्याही तेलाने केस वाढतात असे नाही ,बदाम तेल केसांसाठी उपयुक्त आहे .त्यात व्हिट्यामिन इत्यादी मोठ्या प्रमाणात असते .
३)केसांची स्वच्छता :- ज्या प्रकारे केसांना तेल लावणे गरजेचे आहे तसेच केसांची स्वच्छता राखणे हि आवश्यक आहे .जर केस लांब आहेत तर ते आठवड्यातून दोन वेळा धुवावे . आपल्या केसांची स्वच्छता खूप गरजेची आहे , त्यामुळे केसांचा मुळांना श्वास घेण्यास जागा मिळते
४) संतुलित आहार :- आपल्या केसांसाठी योग्य आणि संतुलित आहार आवश्यक आहे . बदाम , मासे ,नारळ इत्यादी आपल्या आहारात असतील तर केस चांगले राहतील ..
५) केस बांधून ठेवावीत :- प्रदूषण , धूळ ,माती आणि हवेपासून केसांना वाचविण्यासाठी ते बांधून ठेवावेत . जर आपण प्रवास करत असाल तर आपण केस बांधणे जास्त गरजेचे असेल.
६) केसांना ट्रिम करावे :- केसांना तीन महिन्यातून एकदा ट्रिम करावे . त्यामुळे दोन फाटे फुटलेल्या केसांपासून सुटका होईल . केस ट्रिम केल्याने ते चांगले वाढतात .
७) ड्रयर आणि इतर मशीनचा वापर करू नये :- हॉट आयरन , ब्लो ड्रॉयर किंवा केसांना कुरळे करणारे मशीन वारंवार वापरू नये . त्यामुळे केस खराब होता . जरा आपले केस लांब आहेत तर ते वाढविण्यासाठी ड्रयर चा वापर करणे नुकसान करू शकतात , कारण त्याने केस खराब होतात . केस वाढविण्यासाठी ५ मिन उन्हात उभे राहावे पण ड्रॉयर चा वापर करू नये .
८) केस धुण्या पूर्वी साधारण १ तास आधी नारळाचे पाणी केसांना व टाळूला चोळून लावावे या मुळे केस मुलायम तर होतातच , शिवाय केशांच्या मुळाचे पोषण होते . केस गळण्याचे प्रमाण कमी होते व केसांची वाढ वाहायला लागते .
९) केसांठी नारळाचे दूध अतिशय पोषक आणि गुणकारी टाळू ची त्वचा व केस वाढत नसल्यास नारळाच्या दुधाचा उपयोग उपायकारक ठरेल .नारळाचा दूधमध्ये व्हिट्यामिन इ ची गोळी कुटून घालावी व मिश्रणाने टाळूला हलक्या हाताने मसाज करावा .अशे आठोळ्यातून किमान दोन वेळा करावे .या उपायाने निश्चितच केसांचे व टाळूच्या त्वचेचे आरोग्य सुधारते .
१०) जास्वंदीचे फुले हि केस वाढविण्यासाठी आणि केसांचा रंग सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत .जास्वंदी ची फुलेगुणाने थंड असल्याने त्या पासून बनणाऱ्या तेलाचा उपयोग शांत झोपे करीत होतो .
११) दोन अंडी एक लिंबू ,आवळा पावडर याचे मिश्रण केसांचा मऊपना वाढविते कोंडा काढण्यास मदत करते
१२) आंबट दही केसांचा मुळा पासून लावणे , केसचा तेलकट पणा कमी होतो
१३) लिंबाची पाने रात्री पाण्यात भिजत ठेवावी , सकाळी हे पाणी उकडून त्याने स्नान करावे . केसातील कोंडा दूर होतो .