* मेकअप टिप्स *
उन्हाळ्यात मेकअप कसा करावा
१.उन्हाळ्यात खूप जणींच्या मनात भीती असते कि आपला मेकअप उन्हाच्या उष्णतेने वितळणार तर नाही ना ?किंवा घामाने पुसला जाणार नाही ना ?आपण लग्नसमारंभाला किंवा एखाद्या पार्टीला जातो ,कार्यक्रमाला जातो तेव्हा तर हि काळजी नक्कीच वाटते .उन्हाळ्यात मेकअप करून बाहेर जायचं असेल तर तो कसा केला पाहिजे ते पाहू या .
२.फाउंडेशन :
या सिजनमध्ये फाउंडेशनचा वापर न केलेलाच बरा .फाऊंडेशनला उत्तम पर्याय आहे .प्रायमर..चांगल्या दर्जाच्या प्रायमरचा पातळ व हलका थर लावा .प्रायमरने त्वचा उजळून दिसते तसंच मेकअपही टिकून राहतो आणि सर्वात महत्वाचं चेहरा घामेजलेला किंवा तेलकट न दिसत टवटवीत दिसतो .मिनरल फाउंडेशन हा हि एक चांगला ऑप्शन आहे .उन्हाळ्यात पावडर कधीही चांगली ,कारण पावडर त्वचेचे ऑइल आणि घाम कंट्रोल करते .
३.कन्सिलर:
याचा जरूर वापर करावा .चेहऱ्यावरील ब्लॅक स्पॉट्स किंवा पॅचेस झाकण्यासाठी कन्सिलरची गरज भासते .त्वचेच्या पोत नुसार शेड निवडून आवश्यक त्या भागावर लावावे व पावडर लावून सेट करावे .
कन्सिलरने इन्स्टंट फ्रेश लुक येते .
४.लिपस्टिक :
ओठ नेहमी तजेलदार व मऊ राहतील याची काळजी घ्या .कलर लीप बामने ओठांना मॉइ श्र्चर मिळते तसेच ओठ कलरफूलही दिसतात .लिपग्लॉस किंवा लिपस्टिक पेक्षा लीप स्टेनला प्राधान्य द्या .लीप स्टेन ओठांवर जास्त काळ टिकून राहतो .तसेच नॅचरल लुक देतो .जर लिपस्टिकचा वापर करायचा असेल तर आधी फाउंडेशनचा बेस तयार करावा आणि मग लिपस्टिक अप्लाय करावी .यामुळे लिपस्टिक समप्रमाणात लागते व ६ ते ७ तास टिकून असते .
५.आयशॅडो :
गर्मीच्या दिवसात क्रीम किंवा प्रेस्ड पावडर आयशॅडो उत्तम आहेत .कारण डोळ्यांना ते बस्तातही आणि घामाने पसरण्याची शक्यताही कमी असते .सिलिकॉन बेस्ड आयशॅडो हाही एक चांगला पर्याय आहे .आयशॅडो अप्लाय करण्याआधी पापण्यांना आयशॅडो प्रायमर लावावे .यामुळे कलर व्हाईब्रँट राहतो आणि घामाने येणाऱ्या क्रीज -लाइन्सनाही रोखतो .
६.लायनर व मस्कारा :
वाटरप्रूफ लायनर /मस्कारापेक्षा वॉटर रेझिस्टंट लायनर /मस्कारा जास्त योग्य ठरेल .वॉटर रेझिस्टंट लायनर /मस्कारा तुलनेने सॉफ्ट आहेत .बाहेर जातांना नेहमी पर्स मध्ये कॉम्पॅक्ट असू द्यावा .टच -अप करण्यासाठी आणि नको असलेली चेहऱ्यावरील शाईन किंवा ऑइल घालवण्यासाठी कॉम्पॅक्ट लावावा.ब्लॉटिंग पेपरनेही चेहऱ्यावर जमा झालेले ऑइल टिपता येते .ब्लॉटिंग पेपरने चेहरा अलगद टिपून घ्यावा ,घासू नये .
७.समर मेकअप टिप्स :
१.घामाने मेकअप खराब होणार नाही ना ,या चिंतेत असाल तर समर मेकअप टिप्स बघा .या अमलात आणल्या तर तुम्ही नक्कीच सुंदर आणि कॉन्फिडन्ट दिसाल ..
२.पहिल्यांदा लक्षात असू द्या कि ,उन्हाळ्यात मेकअप हा फक्त घामाने किंवा उष्णतेने खराब होत नसून त्वचेवर जमा होणाऱ्या ऑईलने जास्त खराब होतो .इतर कुठल्याही ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात त्वचा जास्त प्रमाणात ऑइल बाहेर टाकते .त्यामुळे फेस क्लिन्सर घेतांना ऑइल फ्री आहे याची खात्री करून घ्या .
३.फक्त उन्हाळ्यात नाही तर सर्व ऋतुंमध्ये सुंदर दिसण्याचे रहस्य आहे स्वच्छ आणि टवटवीत त्वचा .त्यासाठी चांगल्या प्रतीचे स्क्रब नक्कीच तुम्हाला मदत करेल .स्क्रबची निवड करतांना त्वचेची पोत लक्षात असू द्या .शक्यतो हार्श स्क्रब (अति खरखरीत )-उदाहरणार्थ अप्रिकॉट स्क्रब टाळा .सौम्य स्क्रब केव्हाही चांगले तसेच त्वचा तुकतुकीत दिसण्यासाठी आणि त्वचेवरील छिद्रे बंद किंवा कमी होण्याकरिता टोनर लावायला विसरू नका .
४.आताच्या उन्हात केव्हाही सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडू नका .त्वचेच्या संरक्षणासाठी चांगले SPF (Sun protection factor )असलेले सनस्क्रीन वापरा अतिशय नाजूक त्वचेसाठी रडा ७० पर्यंत असलेले सनस्क्रीन वापरा प्रीमॅचुअर ,मॅच्युअर एजिंग ,पिगमेंटेशन ,सन बर्न किंवा तत्सम प्रकारची हानी टाळण्यासाठी सनस्क्रिनचा वापर अत्यावश्यक आहे .
* मेकअप जितका कमी तितका चांगला *