ओठांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय

                             *  ओठांचे सौंदर्य *


१.ओठ काळे पडले असतील तर दुधात मीठ मिसळून लावावे .काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे.


ओठांवर पापडी जमा होत असेल तर लोण्यात केशर मिसळून ओठांना लावावे .लिंबाच्या रस ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी उपयुक्त .


-खाण्याच्या सोड्यात लिंबाच्या रस मिसळून दात साफ केल्याने दात मोत्यासारखे चमकतात .


-लिंबाचा रस लावल्याने ओठांचा काळपटपणा जातो .


-गुलाब आणि ग्लिसरीन याची पेस्ट करावी .ही पेस्ट रात्री झोपतांना ओठांना लावावी .सकाळी उठल्यावर गार पाण्याने धुवावे .ओठांचा रंग लालसर होईल .


पुदिन्याच्या पानांचा रस : गुलाबी ओठांसाठी पुदिनाच्या पानांचा रस १५ मिनिटे लावून ठेवावा .नंतर गार पाण्याने धुवावा .


काळपट रंग कमी करण्यासाठी उपयुक्त : तुमच्या ओठांचा काळपट रंग जाण्यासाठी आणि गुलाबी रंग येण्यासाठी रोजच्या रोज मध लावत जा .


नारळाचे तेल ओठ चमकदार करण्यासाठी उपयुक्त :नारळाचे तेल ओठांवर दररोज रात्री लावावे .ओठ चमकदार बनतील .


मऊ आणि गुलाबी ओठ :ग्लिसरीन आणि दह्याचे मिश्रण ओठांवर लावल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतील .


ओठ फुटलेले असतील तर ओठांना चीझ लावले तर ते मऊ होतील .


बीटाचा रस ओठांवर लावल्यास ओठ लाल होतात .


धन्याची पावडर लिंबाच्या रसात घालून ओठांवर ५ते १० मिनिटे मसाज करा नंतर धुवून टाका .सात ते दहा दिवसांनी ओठांचा रंग गुलाबी होतो .


खोबरेल तेल ओठांचा रंग लाल करण्यासाठी उपयुक्त :झोपण्यापूर्वी २-३ थेंब खोबरेल तेल आणि टोमॅटोचा रस ओठांवर लावा .त्याने ओठांना छान लाल रंग येईल .


 बिटाच्या रसात लोणी घालून ओठांना लावल्यास ओठांचा रंग उजळतो .


ओठ फाटल्यास : ओठ फाटून त्यातून रक्त येत असल्यास कोकम तेल आणि शुद्ध तूप यांचा वापर करावा .


मलई :दुधाची साय ओठांना मुलायम करते सायीमध्ये फॅट मुबलक प्रमाणात असते .ओठांवर हळुवार साय चोळा .५-१० मिनिटांनंतर कापसाच्या बोळ्याने साय पुसून ,ओठ स्वच्छ करा .


काकडी : ओठांची शुष्कता कमी करून त्यांना टवटवीत करण्याची क्षमता काकडीमध्ये आहे .काकडीचा तुकडा ओठांवर हलक्या हाताने चोळल्यास ओठांचे सौंदर्य वाढते .


ऑलिव्ह ऑइल : ओठ सुकणे तसेच फुटणे अशा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित ऑलिव्ह ऑईलचा वापर करा .नियमित लीप बाम ऐवजी ओठांना ऑलिव्ह ऑइल लावा .


मध : ओठांवर मध लावून त्यांच्यावरील ओलसरपणा कायम ठेवता येतो .मध कायम रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लावा .तुमचे ओठ सूर्यप्रकाशामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा तजेलदार करण्याचा हा चांगला मार्ग आहे . 


कोरफड : चवीला थोडे कडवट असलेले कोरफड ,ओठांना हायड्रेट ठेवण्यास मदत करते .कोरफडीचे पान मधोमध कापून त्यातील गर ओठांना लावा .


तूप : तूप नेहमी घरात उपलब्ध असते .तुपाचाही मधासारखा उपयोग होतो .रोज ओठांना तूप लावून त्यांचा ओलसर पण वाढतो .आठवड्याभरात तुमचे ओठ पूर्वी सारखेच सुंदर दिसतील .


डाळिंबाची साल आणि डाळिंबीच्या दाण्यांचा रस ओठांवर चोळून लावावा ,यामुळे ओठांचा रंग उजळेल .ओठ फाटून त्यातून रक्त येत असल्यास कोकम तेल आणि शुद्ध तूप यांचा वापर करावा ,किंवा  व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल फोडून ओठांवर चोळावी .


वातावरणातील बदल ,वाढते वय आणि ‘ब ‘जीवनसत्वाची कमतरता यामुळे ओठ फुटतात .ओठांच्या कडेला भेगा पडल्यामुळे तोंड उघडणे कठीण होते .यापासून सुटका होण्यासाठी फळे ,भाज्या ,मासे अंडी ,सुकामेवा ,दूध यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा .तसेच योग्य प्रमाणात पाणी पिणे ओठांसाठी आवश्यक आहे .


   ओठांची काळजी 

Leave a Comment

en_USEnglish