केसांना नियमित तेल लावण्याचे फायदे

                                               

       केसांना नियमित तेल लावण्याचे फायदे 


१.केसांना तेल लावण्यापूर्वी ते किंचित गरम करावे व कोमट तेलाने केसांना मसाज करावे .

२.तेलात बोट घालून ,हाताने केसांचा भंग पाडून घ्या व टाळूवर हलक्या हाताने तेल लावा .

३.केसांवर तेल थापून ठेऊ नका .गरजेपुरतेच तेल हातावर घेऊन टाळूवर मसाज करा .जास्त तेल म्हणजे ते कडण्यासाटी जास्त शाम्पू लागेल .

४.तेल लावताना केस तळव्यावर घेऊन चोळू नका .यामुळे केस तुटण्याची शकता असते .टाळूवर १०-१५ मिनिट मसाज करावा ,यामुळे रक्तप्रवाह सुधारतो .

५.रात्र भर केसांवर तेल राहू घा.जास्त वेळ तेल केसांवर राहणे चांगले असले तरीही २४ तासापेक्षा अधिक काळ ठेऊ नये .त्यामुळे घाण जमून केस दुबळे होण्याची शकता असते .

६.गरम टॉवेलने केसांना वाफ देणे हा एक उत्तम मार्ग आहे .यामुळे केसांमध्ये तेलाचे योग्य रित्या शोषण होते .मात्र १० मिनिटापेक्षा टॉवेल केसांवर ठेऊ नका .

७.किमान आठवड्यातून एकदा केसांना तेल अवश्य लावावे .

८. ‘ज्ञानतंतूंचे बल’इच्छावर्ती स्नायू आणि अवयवांची शक्ती वाढते .

९.दृष्टी सुधारते ,गाल आणि डोळे यांस बल प्राप्ती होते .

१०.डोक्यावरील केसांची वाढ चांगली होऊन ते लांब ,काळे मृदू आणि सशक्त होतात .

११.मुखाची कांती टवटवीत होते .तेथील सुरकुत्या नाहीशा होऊन त्वचारोग आणि तारुण्यपिटिका उध्दभवत नाहीत .

१२.अकाली केस पिकणे आणि टक्कल पडणे यांस आला घातला जातो .

१३.डोकेदुखी होत नाही .

१४.डोक्यामध्ये खवडे होत नाहीत आणि खाज सुटत नाही .

१५.झोप चांगली /शांत लागते .

१६. मुळातच तुमचे केस तेलकट असल्यास त्यांना पुन्हा तेल लावतांना मसाज करणे टाळा .

                                  

                                       २.टोनिंग लोशन :

-ग्लासभर पाण्यात एक मोठा चमचा लाल व्हिनेगर व चिमूटभर मीठ टाकून चांगलं हलवा .या मिश्रणाने केसांच्या मुळांना हळुवार मसाज करा .एका तासाने केस धुऊन नंतर विंचरल्याने केस मऊ होतात .


                                          ३.कोरड्या केसांसाठी शाम्पू :

-एक ग्लास दुधात एक अंड फेटून घ्या .मिश्रणात भरपूर फेस आल्यानंतर केसांना चांगल्या प्रकारे लावा .पाच मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा .आटवड्यातून दोनवेळा हा प्रयोग नक्की करा . 

-एका नारळाच्या दुधात दोन चमचे चण्याचे पीठ किंवा एक लहान चमचा शिकेकाई पावडर मिसळा .केस व केसांच्या मुळांना हे मिश्रण चांगल्याप्रकारे लावा .पाच मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा .



                            

Leave a Comment

en_USEnglish