*केसांना मेहंदी कशी लावायची *

*केसांना मेहंदी कशी लावायची *  

1. कृती व पद्धत :

 १.मेहंदी हे एक आयुर्वेदिक रोप आहे .थंडपणाच्या गुणधर्मामुळे अनेक स्त्रिया डोक्याला मेहंदी लावणे पसंत करतात .मेहंदीने एक नैसर्गिक रंगही केसावर चढतो . 
२.मेहंदी योग्य पद्धतीने लावल्यास त्याचा परिणाम लवकर आणि चांगला दिसून येतो .
 ३.मेहंदी स्थाननि गुणाने ‘केश्य ‘म्हणजे केशवर्धक व केशरंजक आहे ,तसेच शोथहर दाहप्रशसन व वेदना स्थापनाही करते .म्हणूनच एक थंडावा देणारी वनऔषधी म्हणून उष्ण कटिबंधात हीच सरार्स वापर होत होता .हळूहळू हि मेहंदी सौंदर्य प्रांतात शिरकाव करती झाली आणि आता तर एखाद्या राणीच्या थाटशत पूर्ण जगभर प्रस्थापित झाली आहे .
 ४.केसांकरिता मेहंदी वापरायचे अनेक फायदे आहेत .मुख्यत्वेकरून मेहंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी अशीच नियमित लावल्याने केसांचे आरोग्य सुधारते .केसांवर एक छान चकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात .ज्याला कंडिशन असे म्हटले जाते .केस अकाली पांढरे होत नाहीत .डोक्यात कोंडा होण्याचा थांबतो व केसांची वाढ होते. तुरळक पांढरे झालेले केसांना मेहंदी लावून झाकता येते .मात्र पूर्ण किंवा जास्त पांढरे केस असणारे बहुधा रासायनिक डायचं लावतात .परंतु त्यांनाही या द्रव्याचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून १५ दिवसातून एकदा मेहंदी लावावी .
 ५. चाळीशी उलटल्यानन्तर केस पांढरे होणे हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे .पण आजच्या धावपळीच्या युगात केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे .शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची कमतरता ,एखादा जुना आजार किंवा काही वेळा औषधे यांच्यामुळे हि केस पांढरे होतात . 
६.केस पांढरे झाले कि मेहंदी लावणे हा त्यावरील उपाय आहे .पण कोणती मेहंदी लावावी ,त्यात कोणकोणत्या वनौऔषधी असाव्यात हे अनेकदा माहिती नसते . 
७.मेहंदीचे मिश्रण संतुलित नसेल तर केस शुष्क होणे आणि पांढरे होण्याचे प्रमाण अजून वाढू शकते .आपण अंदाजानेच मेहंदी मध्ये वनॊऔषधी टाकतो .पण हे प्रमाण संतुलित नसेल तर केसांसाठी ते अपायकारक ठरू शकते .जास्तकाळ साठवून ठेवलेल्या वनॊऔषधी वापरू नका .कारण त्या केसांना अपायकारक ठरू शकतात . ८.मेहंदीत वापरण्यासाठी वनॊऔषधीचे मिश्रण तयार करून घ्या .त्याने पांढऱ्या केसांना गर्द भुरा रंग तर मिळतोच सोबतच केस पांढरे होण्याचे प्रमाण देखील कमी होते .त्यात प्रमुख हरितकी ,विभितकी ,आमलकी ,घृतकुमारी ,जास्वंद या वनौऔषधी आहेत . 

 2.प्रयोगाची कृती : –


आवश्यक तेवढे पाणी घेऊन त्यात दोन ते तीन चमचे चहा पावडर टाकून उकळवून घ्या . -हे पाणी गाळून घ्या .पाणी थंड करून त्यात दोन ते तीन चमचे मिश्रण टाका .आवश्यक तेवढी मेहंदी टाकून लेप बनवून घ्या . -हे मिश्रण लोखंडी भांड्यात रात्रभर ठेऊन घ्या .दुसऱ्या दिवशी सकाळी केसांच्या मुळापासून सम्पूर्ण केसांना व्यवस्थति लावून घ्या . दोन ते अडीच तास राहू घ्या .हाताला लावतो तीच मेहंदी वापरा .’केसांना लावायची मेहंदी ‘या नावाखाली जी मेहंदी मिळते तिचा वापर टाळा .कारण यात धोकायदायक रसायने असतात . त्यामुळे केस पांढरे होण्याचे प्रमाण आणखी वाढते .तसेच केस शुषक होतात .जास्त दिवस साटा करून ठेवलेली मेहंदी वापरू नका .केसांची मेहंदी धुण्यापूर्वी थोडा शाम्पू पाण्यात मिसळीं केस धून घ्या . -चांगल्या परिणामांसाठी साध्या पाण्याने मेहंदी धुऊन रात्री तेल लावून ठेवा.सकाळी गरम पाण्याने टॉवेलने वाफ घेऊन केस शाम्पूने धुवा .मेहंदीचा प्रयोग २० दिवसांपेक्षा कमी अंतराने करू नका .मेहंदीचे मिश्रण रात्रभरापेक्षा जास्त काळ ठेऊ नका . 

 3.मेहंदी लावण्याची पद्धत : 

१.लोखंडी कढईत पाणी घेऊन त्यात चहापावडर किंवा कॉपी मिसळा .पाणी उकळल्यावर ते थंड होऊ घ्या आणि मग त्यात मेहंदी भिजवा .केसांना चांगला रंग येतो .
 २.काही तास मेहंदी भिजल्यानन्तर ती केसांवर लावण्यासाठी कलर लावण्याचा ब्रशचा उपयोग करा . 
३.केसांची एक एक बट घेऊन हळूहळू मेहंदी पूर्ण केसांना लावा . 
४.मेहंदी थोडी पातळ असू घ्या त्याने मेहंदी केसांवर वरवर न लागता मुळाशी जाईल . 
५.मेहंदीला शॉवर कॅप अथवा गरम टॉवेल ने कव्हर करा . 
६.एका तासांनंतर मेहंदी साध्या पाण्याने धुवा .
 ७.कंडिशनिंग करायचे असल्यास मेहंदी लावतांना आपण त्यात दही सुद्धा मिसळू शकतात . .
 
*.अश्याप्रकारे आपण पांढऱ्या केसांना कंडिशनिंगसहित कलरही करू शकता .

Leave a Comment

en_USEnglish