केसांसाठी घरगुती शाम्पू

 केसांसाठी घरगुती शाम्पू 


                                             १.तेलकट केसांसाठी :

-दोन चमचे शिकेकाई पावडर ,एक चमचा हिरव्या चण्याची पावडर ,अर्धा चमचा मेथी पावडर एकत्र करून चांगले मिश्रण तयार करावे .केसांना लावायच्या आधी मिश्रणात अंड्याचा पांढरा बल्क घालून तो केसांना शाम्पूप्रमाणे लावा .हा शाम्पू केसांना लावल्यानंतर फेस येत नाही पण केस स्वच्छ होतात .

-एक ग्लास रिठे ,चार ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे .सकाळी हे पाणी कुस्करा व पाणी गाळून घ्या .या पाण्यात एक चमचा शिकेकाई पावडर मिसळून त्याने केस धुवा .केसांना चमक येते .

                                  

                                       २.टोनिंग लोशन :

-ग्लासभर पाण्यात एक मोठा चमचा लाल व्हिनेगर व चिमूटभर मीठ टाकून चांगलं हलवा .या मिश्रणाने केसांच्या मुळांना हळुवार मसाज करा .एका तासाने केस धुऊन नंतर विंचरल्याने केस मऊ होतात .


                                          ३.कोरड्या केसांसाठी शाम्पू :

-एक ग्लास दुधात एक अंड फेटून घ्या .मिश्रणात भरपूर फेस आल्यानंतर केसांना चांगल्या प्रकारे लावा .पाच मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा .आटवड्यातून दोनवेळा हा प्रयोग नक्की करा . 

-एका नारळाच्या दुधात दोन चमचे चण्याचे पीठ किंवा एक लहान चमचा शिकेकाई पावडर मिसळा .केस व केसांच्या मुळांना हे मिश्रण चांगल्याप्रकारे लावा .पाच मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा .


     #  केसात कोंडा झाल्यास #


१.केसात कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना १० मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत .

२.केसात कोंडा झाल्यास दोन ऍस्प्रिनच्या गोळ्या कोणत्याही डँड्रफ शाम्पूमध्ये विरघळून घ्या .या शाम्पूने केस धुवा .३.आवळा व शिकेकाईने केस धुतल्याने केसांतील कोंडा नष्ट होतो .

४.केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावून २० मिनिटापर्यंत ठेवावे .मग गार पाण्याने केस धुवावेत .कोंडा काढण्यास हा सर्वात उत्तम उपाय आहे .

५.कोंड्यासाठी कडुलिंबाचा व तुळशीचा पाला चटणी सारखा वाटून तो केसांना लावून ठेवावा व नंतर केस धुवावेत .कडुलिंबामध्ये असलेल्या औषधी गुणांमुळे कोंडा कमी होतो .तसेच गंधकाचे पाणीहि केसांच्या मुळांना लावलेले कोंडा कमी होतो .

६.कोंड्यामुळे खास सुटत असलेल्या केसांना कधीही तेल लावू नये .केस धुण्यासाठी औषधी शाम्पूचा वापरावा .रोज नाही तरी आठवड्यातून २/३ वेळा केस धुऊन ते उन्हात वाळवावेत ,हे केसांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे .

१०.खोबरेल तेलात कपूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही .


.       

Leave a Comment

en_USEnglish