* केस गळण्याचे उपाय *

    *   केस गळण्याचे उपाय *


कधी कधी केस गळणे हि सामान्य गोष्ट आहे .मात्र दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंता जनक बाब आहे .तर विचार करा ,दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाहीत .परंतु घाबरून जाऊ नका .हि खरी गोष्ट आहे ,केस गळणे हे धोकादायक आहे .यावर लक्ष केंद्रित केले तर तुमचे केस गळणार नाही .त्यासाठी एक रामबाण औषध आहे .ते म्हणजे कांद्याचा रस .


१.कांदा हा केस गळती रोखतो .कारण कांद्यामध्ये सल्फर मात्र अधिक असते .कांद्याचा रस काढून तो केसांना लावल्यास सल्फरमुळे रक्त संचार चांगला होतो .त्यामुळे कांद्याचा रस हा स्कल्प इन्फेक्शन नष्ट करतो .आणि त्याच बरोबर केसांना मजबूत बनवण्यास मदत करतो .


२. कसा उपयोग करायचा :

कांद्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून वाटावा .त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यावा .हा रस केसांना लावावा तीन मिनिटांनंतर चांगल्या शाम्पूने केस धुऊन टाकावेत .कांद्याचा रस आठवड्यातून तीन वेळा लावणे आवश्यक आहे .


कांद्याच्या रसा बरोबर मध लावलेले चांगले असते .एक चतुर्थ कप रसात थोडेसे मध मिसळावे .हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावावे .त्यामुळे केस गळण्याची समस्या दुर होईल .


एक कांदा कापून रम भरलेल्या ग्लासात टाकावा .कांदा एक रात्र तसाच ठेवावा .दुसऱ्या दिवशी रम काढून घ्यावी .त्यानंतर कांद्याचे तुकडे वेगळे होतील .या रम ने केसांचा मसाज करावा .आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा .केस गळायचे थांबतील .


एक चमचा मध आणि एक चमचा दालचिनी पावडर मध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल घेऊन त्याची पेस्ट करावी .केस धुण्याआधी हि पेस्ट केसांना लावावी .१५ मिनिटानंतर गरम पाण्याने केस धुवावे .असे केल्यानंतर काही दिवसांनी केस गळण्याची समस्या दूर होईल .


आकाशवेल (अमर वेल) पाण्यात उकळा .या पाण्याने केस धुतल्याने केस गळणे थांबते .


३.केस गळण्यासाटी हे टाळा :

तुमचे जास्त केस गळत असतील तर तुम्ही चहा आणि कॉफि घेण्याचे टाळा .तसेच नशायुक्त पदार्थांचे सेवन करू नका .धूम्रपान करण्याचे टाळा .त्यामुळे केस गळण्याचे तात्काळ बंद होईल .जास्तीच -जास्त पाणी प्या .


मोहरीचे तेल मेहंदीच्या पानावर टाकून पाने गरम करावीत .ती थंड करून दररोज केसांना लावावीत .त्यामुळे केस गळण्याचे थांबतील .


मेथीचे बी रात्री पाण्यात भिजत टाका .सकाळी उंबळलेले बी वाटा आणि त्याचा लेप केसांना लावा एक तास लावून ठेवा त्यानंतर केस धुवा .हे केल्यानंतर काही दिवसांनी केस गळतीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळेल .तसेच नवीन केस उगवण्यासाठी मदत होईल .


नारळाच्या तेलात कपूर मिसळून केसांना लावणे अधिक चांगले .केस धुण्याआधी एक तास हे तेल केसांना लावणे आवश्यक आहे .त्यामुळे केस गळायचे थांबतात .


४.काहीजण प्रदूषणामुळे ,कोंड्यामुळे तर काही तणावपूर्व जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्यांशी झगडत असतात .तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केस गळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५० ते १०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे ,अशावेळी हे काही घरगुती उपाय करून पहा .


-एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा  

-रस टाळूवर १५ मिनटांसाठी लावून ठेवा 

-सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या 

-आठवड्यातून दोनदा हा उपाय करून पहा .


६.लसूण :

कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही ‘सल्फरचे ‘ घटक असतात म्हणूनच पारंपरिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचे आढळून येते .


कसे कराल :

-लसण्याच्या काही पाकळ्या ठेचून घ्या .

-त्यात खोबऱ्याचे तेल घालून गरम करून घ्या .

-मिश्रण थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळाशी लावा .

-३० मिनिटे तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुवून टाका .

-असे आठवड्यातून दोनदा करा .


७.नारळ :

केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे .नारळातील उपयुक्त मेद ,प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते .केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दूध व तेल अतिशय उपयुक्त ठरते .


कसे कराल 

-नारळाचे तेल गरम करून घ्या व केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावा .

-तासाभराने केस धुवून टाका 

-किंवा खोबरे किसून त्याचे दूध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा .

-रात्र भर ते राहू द्या दुसऱ्यादिवशी सकाळी केस धुवून टाका .


८.हिना :

केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत ‘हिना’ प्रामुख्याने वापरली जाते मात्र मुळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हिना त आहे .


कसे कराल 

-२५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम धुतलेली हीनाची पाने घाला .

-हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या 

-आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा व उर्वरित हवाबंद डब्यात ठेवा .


सुकी हिना पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा .एका तासानंतर केस धुऊन टाका .


९.केस गळतीवर गुणकारी हिना :


-हिना मुळे केस घनदाट ,मऊ व सुंदर बनतात व केसांची पोत सुधारण्यास मदत होते .

-हिनाच्या वापरामुळे टाळू व केसांच्या देखभालीस मदत होते .त्याच्या आवरणामुळे केस तुटण्यापासून बचावतात .

-हीनामुळे केस दाट व घट्ट होतात .


१०. जास्वंद :


जास्वंद केसांना पोषण देतात ,केस गळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात .

कसे कराल :


-काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा .

-हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा .

-थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .


११.अंड:

अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत .त्यातील सल्फर ,फॉसफरस .आयोडीन ,झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात .


कसे कराल :

एका अंड्यातील पांढरा भाग एक टीस्पून ऑलिव्ह तेलात मिक्स करा हे मिश्रण फेटून केसांना लावून ठेवा .

-१५ ते २० मिनीटानंतर थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .


केस गळत असल्यास उपाय 

Leave a Comment

en_USEnglish