केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

  केसांसाठी आयुर्वेदिक उपाय 

                                               १ .आवळा पावडर 

-आवळ्याची पावडर काळ्या रंगाच्या लोखंडाच्या भांड्यात एक दिवस ठेवा .

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा .हि पेस्ट सम्पूर्ण आठवडाभर पाणी मिसळून लोखंडच्या भांड्यात ठेवा .

आठवड्याभरात या पेस्टचा रंग हि काळा होईल .पूर्ण काळी झाल्यांनतर हि पेस्ट डायप्रमाणे केसांना लावावी .दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या दिवशी हा प्रयोग करून पहा .केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतील आणि त्यांची चमकहि वाढेल .

                                               २.शिकेकाई :

-शिकेकाई आणि सुका आवळा चांगला ठेचावा .दोन्ही तुकडे पाण्यात रात्र भर ठेवून सकाळी हे पाणी गाळतांना कापडाने ते दाबून एकत्र करावे .या पेस्टने केसांना मालिश करावी .

-मालिश नन्तर अर्ध्या तासाने अंघोळ करावी .केस वाळल्यानन्तर  खोबरेल तेल लावावे .असे केल्यास केस काळे ,दाट,लांबसडक आणि चमकदार होतात .विशेष म्हणजे ,शिकेकाई आणि आवळा वापरल्यास केस कधी पांढरे होत नाही आणि ज्यांचे पांढरे झालेत ते काळे होतात .

                                          ३.खोबरेल तेल ,जैतुन तेल आणि निंबू 

-खोबरेल तेल आणि जैतुन तेल (ऑलिव्ह ऑइल )समप्रमाणात मिसळून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेम्ब टाका .या मिश्रणाने केसांना मालिश करा .मालिश नन्तर डोके गरम टॉवेलने तीन मिंट झाकून ठेवा .असे केल्यास केस गळणे थांबते .आणि केस काळे होतात .

                                         ४.मेथी पावडर 

-मेथीच्या बियाणं मध्ये केसांना पोषक असे सर्व तत्त्वे असतात .मेथीच्या दाण्यांमध्ये फॉस्फेट,लेसिथीन ,न्यूक्लिओ -अल्बुमिन आणि कॉड लिव्हर ऑईलबरोबरच फॉलिक ऍसिड ,मॅग्नेशियम ,सोडियम ,जस्त ,तांबे नियासिन ,थायामीन ,कॅरोटीन ,इ.पोषक द्रव्य असतात .हि पोषक द्रव्य केसांच्या मुळांना मजबूत करतात .मेथीच्या दाण्यांचे ग्राइंडर मध्ये चूर्ण करून पाण्यात कालवून त्याची पेस्ट तयार करा .यामुळे केस काळे ,दाट काळे आणि लांब सडक होतीलच ;शिवाय कोंड्याची समस्या नाहीशी होईल .

                                            ५.अमर वेल

-सुमारे २५० ग्राम अमरवेल ३लिटर पाण्यात उकळा .जेव्हा पाणी अर्ध उरेल आणि अमरवेल पाण्यात पूर्ण पणे वीरगळेल तेव्हा पातेलं उतरवा सकाळच्या वेळी या पाण्याने केस धुवा .यामुळे केस काळे घनदाट आणि लांबसडक होतात 

                                    ६,कडुलिंब 

-कडुलिंबाचे पानें पाण्यात मिसळून ठेचून पेस्ट तयार करा .हि पेस्ट डोक्याला लावा .दोन ते तीन तासांनी केस धुवा यामुळे केस गळणे थांबते .

Leave a Comment

en_USEnglish