घरगुती फेसपॅक

        ** नॅचरल थेरपी **


हळद आणि चंदनाचा फेसपॅक –


१.हळद आणि चंदन पावडर मध्ये दूध घालून याची पेस्ट बनवा .


२.हि पेस्ट चेहऱ्यावर लावून ३.मिनिट हलक्या हाताने मसाज करा .


३.यानंतर १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा .


४.तुम्हाला चमकदार आणि सतेज त्वचा मिळेल .


                   *हळद आणि मधाचा फेसपॅक *


१.मध आणि हळदीमध्ये थोडे गुलाबपाणी मिसळून हा फेसपॅक तयार करा .


२.तो चेहऱ्यावर लावून १० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा .


३.यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होतील .


                             **    गाजराचा फेसपॅक **


१.गाजराचा फेसपॅक तेलकट आणि सामान्य त्वचेसाठी उत्तम मानला जातो .


२.दोन गाजर बारीक करून पेस्ट तयार करून घ्या 


३.त्यानंतर या पेस्टमध्ये अर्धा चमचा मध टाका .


४.त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला १५ मिनिट लावून लावून ठेवल्यांनतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या .


५.या उपायाने त्वचा कोमल आणि चमकदार होईल .


                            **बदाम आणि दुधाचा फेसपॅक **


१.तीन ते चार बदाम दुधात भिजत ठेवा .


२.थोड्या वेळाने त्याची साल काढून ते सर्व बदाम मिक्सरला लावा .


३.त्या पावडरमध्ये हळू -हळू दूध घालून त्याची जाडसर पेस्ट बनवा .


४.दुसरी पध्द्त म्हणजे बदामाच्या तेलात मलई घालून त्याला चेहऱ्यावर लावा .


५.दहा -पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा .


६.तेलकट त्वचा असलेल्यांनी हा फेसपॅक टाळावा .


            *चंदन आणि गुलाबपाणीचा फेसपॅक *


१.चंदन आणि गुलाब पाणी याची पेस्ट बनवा .


२.प्रथम आपला चेहरा कोमट पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवा .


३.तो एका कापडाने टिपून घ्या .


४.चेहरा कोरडा झाल्यावर त्यावर हा बनविलेला फेसपॅक लावा .


५.१५मिनटानी कोमट पाण्याने धुवा .


६.त्यामुळे चेहरा स्वच्छ होतो .


७.उन्हातून  ,दगदगीतून घरी आल्यावर हा फेसपॅक नक्की लावा .


८.हा फेसपॅक लावल्यांनतर त्वचा तर स्वच्छ होईल पण त्या सोबत थंडही वाटेल .


                *बेसन -दह्याचा फेसपॅक *


१.तीन ते चार चमचे बेसन ,तितक्याच प्रमाणात दही आणि त्यात दोन चमचे मध घ्या .


२.या सर्व मिश्रणाची पातळ पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्यावर समप्रमाणात लावा .

३.१५मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा .


४.जेणे करून बेसन आणि दह्यामुळे त्वचा उजळून निघेल आणि मध तुमची त्वचा मोईचराईज करेल .


                        *.मुलतानी माती आणि गुलाब पाणी *


१.मुलतानी माती आणि गुलाबपाणी त्यांना एकमेकात मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि ती आपल्या चेहऱ्यावर लावा .


२.हा फेसपॅक तेलकट त्वचेसाठी सर्वात उत्तम ठरतो .


                       *.टोमॅटो ,लिंबू आणि मध फेसपॅक *


१.एका वाटीत टोमॅटोचा बल्क घ्या ,त्यात दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या .


२.या सर्व मिश्रणाची पेस्ट बनवा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा .


३.दहा ते पंधरा मिनिटे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या .


४.टोमॅटो आणि लिंबू तुमची त्वचा उजळायला मदत करेल तर मध तुमच्या चेहऱ्यावर तेज आणेल .


                        *.लिंबू आणि दूध फेसपॅक *


१.एका वाटीत तीन चमचे दूध ,एक चमचा लिंबाचा रस आणि दोन छोटा चमचे हळद घाला आणि त्याची पेस्ट तयार करा .


२.हि पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावून १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा .


३.या फेसपॅक मुळे चेहऱ्यावरचा तेलकट पणा जाईल .


              *   *.कोरफड आणि हळदीचा फेसपॅक *


१.एक टेबल स्पून हळदीमध्ये ,दूध व काही थेंब गुलाब पाणी टाकून मिश्रण एकत्र करावे .


२.या मिश्रणात थोडा कोरफडीचा गर टाकून फेसपॅक तयार करा .


३.आता चेहऱ्यावरील मुरुमे असलेल्या भागावर फेसपॅक लावा .

४. १५मिनिटांनी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका .


                 *कोरड्या त्वचेसाठी फेसपॅक *


अर्जुन पावडर १००ग्रॅम ,मंजिष्ठा :१००ग्रॅम ,शंख जिरा १००ग्रॅम ,चंदन पावडर :१००ग्रॅम ,हळद १००ग्रॅम ,जायफळ ५०ग्रॅम ,मायफळ४०ग्राम ,फिटकरी ४०ग्रॅम ,खस्ता ५०ग्रॅम ,मुगडाळ (थोडीशी ) ,मसूर डाळ (थोडीशी ).


हे सर्व साहित्य एकत्र करून त्याचे फेसपॅक करून घ्यावे .


हा फेसपॅक दूध आणि सायीसह लावावा .


थंडीत कोरडी त्वचा खरखरीत होते .या कोरड्या त्वचेसाठी हा फेसपॅक लावावा.


              घरगुती  फेसपॅक 

Leave a Comment

en_USEnglish