-उजळ चेहरा कोणाला आवडत नाही .परंतु बहुतांश लोक या दुविधेमध्ये राहतात कि ,एवढ्या कमी वेळेत चेहरा कसा उजळ करावा .तस पाहायला गेलं तर सुंदर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही .यासाठी योयग आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे .परंतु सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यस्थित लक्ष देऊ शकत नाही .वेळेवर लक्ष न दिल्याने अनेक जणांच्या त्वचेची चमक कमी होऊ लागते तुम्हाला देखील हि समस्या उदभवली असेल .तर तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय .या उपायांमुळे तुमची त्वचा उजळ होण्यास नक्कीच मदत होईल .
१.दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एकत्र करावी .त्यामध्ये साधारण १० थेम्ब गुलाब जल व १० थेम्ब लिंबू टाकू त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा .अंघोळीच्या आधी तयार लेप चेहऱ्यावर साधारण अर्धा तास ठेवावा व नंतर धुऊन टाकावा .
२.डोळ्याच्या खाली काली वर्तुळे तयार झाली असल्यास रोज डोळ्याच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाटयाच्या तुकड्यांनी हलकी मालिश करावी .असे केल्याने काळी वर्तुळे हळूहळू कमी होण्यास मदत होते .
३.चेहरा तेलकट असल्यास एक चमचा मध १५-२० मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने लावल्यास तेलकट पण कमी होतो .तुम्ही यामध्ये लिंबाचे ४-५ थेम्ब देखील टाकू शकता .
४.ज्वारीचे पीठ ,हळद आणि मोहरीचे तेल पाण्यामध्ये एकत्र करून उटणे बनवून घ्यावे .या उटण्याने रोज शरीराची मालिश केल्याने फायदा होतो .
५.त्वचा उत्तम राहण्यासाठी संत्र्याचा ज्यूस प्यावा .संत्र्याचे साल कोरडे करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावल्यास चार उजळण्यास मदत होते .
६.मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा रंग निखरतो .
७.दोन चमचे काकडीचा रस ,अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूट भर हळद चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो .
८.साधारण चार चमचे मुलतानी माती ,दोन चमचे मध ,दोन चमचे दही आणि एका लिंबाचा रस एकत्र करून साधारण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावा व धुऊन टाकावा .
९.रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्याचा रंग सुधारण्यात मदत होते .
१०.लिंबाच्या पानांमुळे त्वचेची त्वचेची रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते .याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते .साधारण चार- पाच लिंबाची पाने मुलतानी माती मध्ये एकत्र करून त्यामध्ये थोडे पाणी टाकून चांगले बारीक करून घेणे .तयार झालेला हा लेप चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेऊन चेहरा धुवावा .
११.तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केली तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे .पिकलेली केली मॅश करून चेहऱ्यावर अर्धातास लावून ठेवल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते .
१२.चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावावा .
१३.घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन क्रीम अवश्य लावावे यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचे रक्षण होण्यास मदत होते सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचा रंग कमकुवत होतो .
१४.ग्रीन टी मध्ये एंटी-ऑक्सिडेन्ट भरपूर उपलब्ध असतात .याच्या नियमित सेवनामुळे त्वचेवरील दाग-धब्बे दूर होण्यास मदत होते .
१५.चेहऱ्याचा सावळे पणा दूर करण्यासाठी काकडीचा रस फायदेशीर ठरतो . काकडीचा रस काढून साधारण १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून धुतल्यास चेहरा चमकण्यास सुरुवात होते .
१६.अक्रोड मध्ये ओमेगा -३ फॅटी एसिड आढळून येते .अक्रोड खाल्ल्याने या तेलाचे मालिश केल्याने चेहऱ्याची कांती वाढू शकते .
१७.संत्र्याची साल वाळवून चूर्ण तयार करून घ्या .या चूर्णामध्ये थोडेसे कच्चे दूध मिसळून हे मिश्रण चेहऱ्याला लावा .थोड्यावेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या .यामुळे त्वचा कोमल होईल .
१८.पिकलेल्या पपईतील गर चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मालिश करा .त्यांनतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या .
१९.तुमची स्किन खूप ड्राय असेल तर एक लहान चमचा साय घेऊन त्यामध्ये थोडेसे केसर मिसळा .या मिश्रणाने चेहऱ्यावर मालिश करा .थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या .या उपायाने चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होईल .
२०.एक चमचा मधामध्ये एक चमचा पाणी मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा .थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या .
२१.काजू त्वचेसाठी उत्तम मानले जातात .काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या .त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा .स्किन ड्राय असेल तर रात्रभर काजू दुधामध्ये भिजवून ठेवा .सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेम्ब टाकून स्क्रब करा .
२२.एलोवेरा जेलचा म्हणजेच कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा स्वच्छ आणि ओलसर राहील .किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे .
२३.सुर्यफूलच्याबिया रात्रभर भिजत ठेऊन सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी .ती पेस्ट २० मिनिट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल .
२४.आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी ती पेस्ट चेहऱ्यावर १५मिनिट लावावी .त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल .
*चेहरा झटपट गोरा होण्यासाठी घरगुती उपाय *
आजून बयूटी टिप्स बद्दल माहिती जाणून घायची असेल तर खालील लिंक वर क्लीक करा