*चेहऱ्यावरील नको असलेले केस नष्ट करू शकता *
१.चेहऱ्यावर नको असलेले केस महिलांसाठी एक मुख्य समस्या आहे .काही महिलांच्या चेहऱ्यावर पुरुषांसारखे केस येतात .
२.सामन्यात :हनुवटी आणि ओठांवरचे केस महिलांसाठी अडचणीचे ठरतात .बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम आणि जेल मुळे त्वचा खराब होण्याचा धोका जास्त असतो .
३.तुम्हालाही अशा समस्येला सामोरे जावे लागत असलं तर यावर घरगुती रामबाण उपाय सांगत आहे .हे उपाय केल्याने तुमची हि समस्या दूर होईल तसेच त्वचाही खराब होणार नाही .
४.डाळीचे पीठ (बेसन ) आणि अर्धा चमचा दूध ,अर्धा चमचा बेसन ,अर्धा चमचा हळद आणि एक चमचा ताजी साय .या सर्व गोष्टी एकत्र करून चेहऱ्यावर लावा .त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून २५.मिनिटापर्यंत चेहरा तसाच ठेवा .पेस्ट सुकल्यानंतर हाताने चेहरा स्वच्छ करून नंतर पाण्याने धुऊन घ्या .
५.मधाचा उपयोग :कच्च्या बटाट्याचा २ चमचे रस ,रात्र भर भिजून ठेवलेली तूर डाळ बारीक करून घ्यावी ,४ चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध या सर्व गोष्टी एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या .त्यानंतर पेस्ट हि चेहऱ्यावर लावून ठेवा .थोड्यावेळाने पेस्ट वाळल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या .
६.दही :डाळीच्या पिठामध्ये दही मिसळून पेस्ट तयार करून घ्या .हि पेस्ट चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांवर लावा .थोड्यावेळ चेहरा स्क्रब करून स्वच्छ धुवून घ्या .दररोज हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील अनावश्यक केस निघून जातील .
७.हळद आणि उडीद डाळ :हळद आणि उडीद डाळ पावडर पाण्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करून घ्या .या उपायाने चेहरा तेलकट होणार नाही आणि चेहऱ्यावरील अनावश्यक केस हि कमी होतील .
८.साखर आणि लिंबाचा रस :साखर आणि लिंबाचा रस सम प्रमाणात घ्या .या मिश्रणाने चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांवर मसाज करा .पंधरा मिनिट हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवा .त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या .हा उपाय नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरील नको असलेले केस कमी होण्यास मदत होईल .