* फंगसमुळे त्वचेवर होणारे आजार *
१.शरीरातील मृत त्वचेवर फंगस निर्माण होतो आणि मग नेहमी ओलावा असणाऱ्या भागामध्ये हे पसरत जाते .
२.टाचा ,नखे आणि छातीत काही भाग अशा ठिकाणी घामामुळे किंवा सतत पाण्यात राहिल्याने ओला राहतो .म्हणून आपली त्वचा नेहमी कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा .सैलसर आणि हलके सुती कपडे वापर .डॉक्टरांनी सुचवलेल्या अँटीफंगल पावडर आणि क्रीमचा वापर करा .जास्त काळ भिजलेली कपडे वापरू नका .
३.कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून उकळा आणि त्याचा रस या डागांवर लावा .टाकळ्याच्या बिया गंधक आणि लोणी यांच्यासोबत मिसळून लावा .सहा भाग खोबरेल तेल आणि एक भाग गंधक असा लेप करून या डागांवर लावावा .
४.गळू :
अशुद्ध पाणी किंवा घाण पाण्यात तयार होणाऱ्या विषाणूंच्या संपर्कात आल्याने गळूची लागण होते .लहान मुले ,मधुमेह कॅन्सर किंवा एड्सच्या रुग्णांना याची लागण होण्याची शक्यता जास्त असते .यावर उपाय म्हणजे त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा .नियमित अंघोळ करा .
-जखमेशी घाण किंवा अस्वच्छ पाण्याचा संपर्क होऊ देऊ नका .जर जखम चिगळली असेल ,तर डॉक्टरांचा सल्ला घ्या .
-जंतुनाशक साबण व लोशनचा वापर करा .कडुलिंबाची पाने उकळून या पाण्याने अंघोळ करा .
५. खाज सुटणे :
खाज सुटण्याची अनेक कारणे असू शकतात .काही विशिष्ट प्रकारचा औषधांमध्ये असलेल्या उष्णतेमुळेही खाज सुटू शकते .
परंतु ,पावसाळ्यात वातावरणात अस्वच्छ पाणी आणि विषाणूंचे संक्रमण ,यामुळे खाज सुटते .
-अपचन होण्यानेही खाज सुटू शकते .यावर उपाय म्हणजे पावसामध्ये भिजू नका .त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा .स्वच्छ आणि सुकलेले कपडे वापरा .जंतुनाशक साबणाचा व लोशनचा वापरा करा .
दशांग लेप जो आयुर्वेदातील दहा औषधी वनस्पतींपासून बनवला जातो .हा लेप खाज सुटणाऱ्या जागी लावल्याने खाजेपासून अराम मिळतो .कडुलिंबाचे तेल किंवा त्याचा लेप करून लावल्यानेही आराम मिळतो .कोमट पाण्यात गंधक टाकून अंघोळ केल्यानेदेखील फायदा होतो .
६.घामोळ्या :
उष्णतेच्या किंवा उकाड्याच्या दिवसांमध्ये याचा जास्त त्रास जाणवतो .त्वचेवर छोटे -छोटे आणि लाल रंगाचे पुरळ उठतात .काहीवेळा यातून पाणीदेखील येते .खाजदेखील सुटते .यावर उपाय म्हणजे अधिक मसालेदार अन्न खाणे टाळा .
पावसाच्या पाण्यात अंघोळ करा .प्रिकली हिट पावडरचा वापरा करा .बर्फाने पाच ते सात मिनिटे घासल्यानेहि फायदा होतो .कडुलिंबाचे पाने उकळून या पाण्याने अंघोळ करा .
-सकाळच्या वेळेत कडुलिंबाची कच्ची पाने चावून खाल्ल्याने फायदा होतो .
७.पायात खाज उठणे :
पायातील बोटांमध्ये उष्णता आणि ओलावा राहिल्याने याचे संक्रमण होते .यामुळे पायाची त्वचा चिरल्यासारखी आणि लाल पडते .त्या जागी खाज सुटते ,जळजळ होते ,त्वचा फुटते आणि त्वचेची सालटे जातात .
यावर उपाय म्हणजे पावसाच्या पाण्यात पाय भिजू देऊ नका .साबणाने आणि पाण्याने पाय स्वच्छ धुवा .पायाची बोटे कोरडी ठेवा .जंतुनाशक पावडर लावत राहा .कवकरोधी औषधेही यासाठी प्रभावी ठरतात .