** त्वचेची निगा **

                                                                                                     **  त्वचेची निगा **                                                                                      

  

१. ऋतुमानातील बदलाप्रमाणे आपल्या शरीराच्या संरक्षण कवचामध्ये म्हणजे त्वचेमध्ये विविध बदल होतात .याचा आपल्या वेगवेगळ्याअवयवांचा क्रिया संतुलित राखण्यासाठी उपयोग होतो . 


२. उन्हाळ्यात जेव्हा बाहेरचे तापमान वाढू लागते तेव्हा शरीराचे तापमान टिकवून ठेवण्याचे काम त्वचा करते .त्वचेतील ग्रंथीमधून जास्त घाम येऊ लागतो व शरीराचे तापमान संतुलित राखले  जाते  .या दिवसात सुर्प्रकाशातील अतिनील किरणांची तीव्रता जवळजवळ २० टक्क्यांनी वाढते .याचा दुष्परिणाम टाळण्यासाठी त्वचा काळसर पडू लागते (टॅन होणे ).काळसर त्वचेतील रंगद्रव्य मेलॅनिन हे नैसर्गिक सनस्क्रीनचे काम करते .वाढत्या उष्णतेबरोबर त्वचेतील पाणी हळूहळू शोषले जाऊन त्वचा कोरडी व रुक्ष होते .


३. उन्हातील अतिनील किरण ,हवेतील उष्णता व येणारा घाम यामुळे त्वचेवर होणाऱ्या परिणामांची व त्यापासून बचाव करण्याच्या वेगवेगळ्या उपायांची माहिती :


४. अतिनील किरणांचे दुष्परिणाम :


                                                  ५.सण टॅन :

-ऋतूबदलाला सामोरे जाताना सूर्यकिरणांचा आतील पेशींवरील दुष्परिणाम कमी व्हावा म्हणून होणारा हा एक नैसर्गिक बदल .त्वचा टॅन होताना काळसर बनते .त्वचेतील रंगद्रव्य मेलॅनिन हे नैसर्गिक सनस्क्रीनचे असते .

  -त्यामुळे टॅन झालेली त्वचा उन्हापासून आतील पेशींचा बचाव करू शकते .गोऱ्या रंगाच्या व्यक्ती सावल्या रंगाच्या व्यक्तीपेक्षा जास्त टॅन होऊ शकतात .टॅन होण्याची क्रिया एका दिवसात न होता हळूहळू होत असते .


                                                   ६.सण बर्न :

   -यात त्वचा लालभडक होऊन भाजल्यासारखी दिसते .हा बदल जास्त वेळ उन्हात घालवऱ्यावर-उदा -बीचवर खेळणे ,वॉटरपार्कमध्ये जाणे ,अथवा एखाद्या डोंगरावर चढल्यावर -२४ तासाच्या आत दिसून येतो.

     -जो भाग उघडा राहतो त्या जागी त्वचा लाल होणे ,त्वचेची आग होणे व काही वेळा पाण्याने भरलेले फोड येणे ,असे बदल दिसून येतात .साधारण ८ते १० दिवसात हि करपलेली त्वचा पापुद्रयाप्रमाणे निघून जाते .


                                                      ७.सण ऍलर्जी :

-सुर्प्रकाशातील अतिनील किरणांमुळे (UUA,UUB)काही व्यक्तींना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो .यात जो भाग सुर्प्रकाशात येतो -चेहरा ,गळ्याजवळचा भाग ,हातावरचा भाग ,किंवा पावलांवर पुरळ येऊन खाज येऊ शकते .प्रत्येक व्यक्तीनुसार याची तीव्रता कमी -अधिक असते .


                                                         ८.दुष्परिणाम टाळण्याचे मार्ग :


                         a )संरक्षक कपडे 

                          b )सनस्क्रिनचा वापर 

                           c )योग्य आहार 


                                            ९.उन्हापासून बचाव करण्यासाठी वापरण्याचे कपडे :

  -उन्हातील अतिनील किरणांपासून ,तसेच उष्णतेपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सैलसर व सुती कपड्यांचा वापर करावा .

 -गडद रंगाच्या कपड्यात जास्त उष्णता शोषली जात असल्याने शकतो फिकट रंगाचा वापर करावा .

  -कापडाची निवड करताना त्याची वीण बघून घ्यावी .घट्ट विणीच्या कापडापासून बनवलेले कपडे जास्त संरक्षण देता .दिवस बाहेर पडताना टोपी किंवा स्कार्फ व सनकोटचा वापर करावा .

  -स्कार्फ कॉटनचा व जाड असावा .कॉटनच्या मऊ ओढणीचा वापर स्कार्फ म्हणून करता येईल हाताला झाकण्यासाठी कॉटनचे हात मोजे वापरता येतील .


                                    १०.सनस्क्रिनचा वापर :


   -बाजारात गेल्यावर असंख्य प्रकारची सनस्क्रीन उपलब्ध असल्याने नेमके कोणते सनस्क्रीन निवडावे ,याविषयी बऱ्याचदा संभ्रम निर्माण होतो .सनस्क्रिनच्या बाटलीवर SPFC (सन प्रोटेक्शन फॅक्टर )लिहलेला असतो .


  भारतीय त्वचेला SPF15 -30 असलेली सनस्क्रीन उपयुक्त असतात .

-त्वचेच्या प्रकाराप्रमाणे क्रीम ,जेल aquajel अशा प्रकारची निवड वैघकीय सल्ल्याने करावी .पोहायला जाताना पाण्यामध्ये न वीरगळणारी सनस्क्रीन वापरावीत .सनस्क्रीन लावताना योग्य पद्धतीचा वापर केल्याने त्याची उपयुक्त वाढते .हि मलमे त्वचेवर न चोळता हळुवार पसरवणे गरजेचे आहे .बाहेर जाण्यापूर्वी १५ते २० मिनिट मलम त्वचेवर लावावे .दर २ते ४ तासांनी परत लावणे गरजेचे आहे .


                                          ११.   आहार :


 -अतिनील किरण त्वचेत व शरीरात हानिकारक द्रव्य तरार करतात .त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी अँटी ऑक्सिडन्टसचा आहारात समावेश असावा .फळे पालेभाज्या ,सॅलड्स यात नैसर्गिक अँटिऑक्सिडेन्ट भरपूर असतात .पिवळ्या रंगाची फळे ,पपई ,आंबा यात अ जीवनसत्त्व ,तर संत्री -मोसंबी ,लिंबू या पदार्थात क जीवनसत्त्व असते .उन्हाळ्यात या फळांचे सेवन जास्त प्रमाणात करावे .भरपूर पाणी प्यावे .


    अशाप्रकारे उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी जर आपण वेळेवर सज्ज झालो तर निश्चितच हा कडक उन्हाळा आपल्यासाठी आरोग्य पूर्ण होईल व सर्वांची हि सुट्टी हि जास्त आंनददायी होईल .

  

                 त्वचेची काळजी 








                                      

            





















                   














                   

Leave a Comment

en_USEnglish