शरीर निरोगी ठेवण्यासाठी कोणते फळे खावीत

              टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी हि फळे आणि भाज्या खा 


आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या त्वचे कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही .त्यात प्रदूषणामुळे ,तणावामुळे त्वचा खराब होते .त्यामुले त्वचेचे आरोग्य सुधारण्याचा सर्वोत्तम उपाय मन्हजे पोषक आहार होय .त्यासाठी आपल्या आहारात हि १० फळे व भाज्या असणे  आवश्यक आहेत .


                             १.आवळा :

फायदे :आवळा व्हिटॅमिन ए ने परिपूर्ण असून तो त्वचा टवटवीत दिसण्यासाठी आवश्यक असणारे कोलॅजेन वाढवण्यास मदत करतो .

उपाय :सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सरबत पिणे हा आवळा सर्वोत्तम मार्ग आहे .यामुळे कोलॅजेन घटण्याचे प्रमाण कमी होते .(त्वचेची कांती आणि केसांचे सौंदर्य वाढवणारा गुणकारी ‘आवळा ‘!)


                         २.सफरचंद :

फायदे : 

दररोज एक सफरचंद खाल्ले तर नक्कीच तुम्ही अकाली वृध्द् दिसणे लांबवू शकता .यातील व्हिटॅमिन सी  मुळे त्वचा आरोग्य दायी होऊन त्वचेला अकाली सुरकुत्या पडण्याचे प्रमाणही कमी होते .

उपाय :

टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक सफरचंद खा .याशिवाय तुम्ही त्याचा फेसपॅक म्हणूनही वापर करू शकता .सफरचंदाचा गर चेहऱ्याला लावून १० मिनटात चेहरा धुवावा .


                                 ३.बिट 

फायदे :

बिट खाल्ल्याने शरीरातील अँटी ऑक्सिडेंटचे प्रमाण वाढते .तुमच्या शरीरात जर अधिक अँटी ऑक्सिडेन्ट असतील तर तुमची त्वचा अधिक टवटवीत दिसते .बिट हा अँथोसायनिनचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे .यातील अँटी ऑक्सिडेन्ट या घटकामुळे त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत .बिट खाल्ल्याने तुमची कांती उजळून त्वचेला टवटवीत पण प्राप्त होतो .

उपाय :

कच्चे बिट पचनास जड असते .त्यामुळे बिट उकळून त्याचे काप करून खावेत .त्यावर लिंबू पिळून खाल्ले तर त्याची चवही छान होते आणि आरोग्यहि सुधारते .बिट ओठांना लावले तर ओठ गुलाबी होतात .


                                   ४.गाजर :

फायदे :

गाजरामध्ये मोठया प्रमाणात कॅरोटीन असते .त्यापासून शरीराला व्हिटॅमिन ए मिळते .त्यामुळे तुमच्या दररोजच्या आहारात गाजराचा समावेश असणे अत्यन्त आवश्यक आहे .यामुळे तुमची त्वचा टवटवीत होण्याबरोबरच त्वचेच्या सुरकुत्यांपासून बचाव होतो आणि त्वचा आरोग्यदायी होते .

उपाय :

तुम्ही गाजर सलाडमध्ये घालून किंवा त्याचे काप सॅन्डविचमध्ये हि खाऊ शकता .गाजराचा रस प्यायल्याने त्यातील फायबरमुळे आपल्या सौंदर्यात भर पडते .


                                   ५.लिंबू :

फायदे :

त्वचेवर चट्टे ,पुरळ किंवा ब्लॅकहेड्स असतील तर त्वचा निस्तेज दिसते .पण लिंबामुळे या सर्व समस्यांपासून आपला बचाव होतो .लिंबातील व्हिटॅमिन सी मुळे कोलॅजेनचे प्रमाण अनुकूल राहण्यास मदत होते .

उपाय:

एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी सकाळी अनोशा पोटी प्यावे .यात तुम्ही एक चमचा मध घालूनही पिऊ शकता .किंवा सलाड वर लिंबू पिळून खाऊ शकता .मध ,लिंबूपाण्याचे जादुई गुणधर्म तुम्हाला ठाऊक आहेत का ?


                                     ६.भोपळ्याच्या बिया :

फायदे :

एक मूठ भोळ्याच्या बिया खाणे हा त्वचेचा रंग उजळण्याचा खात्रीशीर उपाय आहे .या बियांमधील झिंकमुळे नवीन त्वचापेशी निर्माण होण्यास मदत होते .तसेच यामुळे त्वचेचे तेलकट पानापासूनही संरक्षण होते .

उपाय :

संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाव्यात .तुम्ही आमटीवर सजावटीसाठी या बियांचा वापर करू शकता किंवा सॅण्डवीजमधेही या बिया घालून खाऊ शकता .


                                  ७.पालक :

फायदे :

पालकांमधील अँटी ऑक्सिडेंटमुळे त्वचेचा सुरकुत्या पडण्यापासून बचाव होतो .तसेच त्वचेच्या उती मजबूत होण्यास मदत होते .यातील दहशामकतेमुळे शरीरातील विषारी घटक भाहेर पडून त्वचा नितळ आणि टवटवीत होते .

उपाय :

शिजवलेला पालक सॅलाडमध्ये घालून खातात किंवा त्याची भाजी हि बनवतात .त्वचा आरोग्यदायी राहण्यासाठी पालकांचा रस अतिशय उपयुक्त आहे .


                                           ८.स्ट्रॉबेरी :

फायदे :

स्ट्रॉबेरीमधील म्यॅलिक ऍसिड हा नैसर्गिक व्हाईटनिंग एजेंट आहे .स्ट्रॉबेरीमध्येही अँटिऑक्सिडेन्ट हा घटक असल्यामुळे त्वचा निरोगी राहते .

उपाय :

मूठभर स्ट्रॉबेरी खा किंवा स्ट्रॉबेरीची पेस्ट करून त्यात दही आणि मध घालून हे मिश्रण चेहऱ्याला १० मिनिट लावून ठेवा आणि धुवा .


                               ९.रताळे :

फायदे :

रताळ्यामध्येही व्हिटॅमिन ए असल्यामुळे ते मुरूम निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होण्यास मदत होते .व्हिटॅमिन सी च्या अस्तित्वामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि मुरुमांमुळे पडलेले डाग जाण्यास मदत होते .

उपाय :

केवळ उपासलाच नव्हे तर मधल्या वेळी भूक लागल्यावरहि तुम्ही रताळे खाऊ शकता .रताळे उकळून त्यावर मीठ ,काळी मिरी ,लिंबाचा रस पिळून खाऊ शकता आरोग्यदायी त्वचा मिळवण्यासाठी रताळे खावे .


                             १०.टोमॅटो :

फायदे :

टोमॅटोमध्ये लायकोपिन नामक अँटी ऑक्सिडेन्ट असते .त्यामुळे तुमची त्वचा आरोग्यदायी राहण्यास मदत होते .तसेच टोमॅटो सनस्क्रीन लोशन म्हणूनही काम करतो .टोमॅटो आमलधर्मीय( ऍसिडिक ).असल्याने त्याचा गर त्वचेतील छिद्रे बुजवून मुरुमांपासून संरक्षण करतो .

उपाय :

भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश असतो काही पदार्थांमध्ये त्याचा गरही वापरला जातो .कच्चा टोमॅटो खाणे आरोग्यदायी असते .टोमॅटोचा गर तुम्ही चेहऱ्यालाही लावू शकता .


        *   टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी हि फळे आणि भाज्या खा **

Leave a Comment

en_USEnglish