** सावळेपणा दूर करण्यासाठी उपाय **
– गोरी त्वचा करीता-
१.एक बादली पाण्यात एका लिंबाचा रस टाकावा .या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील बंद रंध्रे खुलतात आणि त्वचा उजळते .
हिवाळ्यात हा प्रयोग करताना गरम पाणी घ्यावे आणि उन्हाळ्यात थंड पाणी घ्यावे .सावळेपणा दूर करण्यासाठी आवळ्याच्या चूर्णात थोडं पाणी मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी .
मसूर डाळ याने त्वचा उजळते –
१.मसूर डाळीची पेस्ट करून त्यात अंड्याची जर्दी मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी .
२.या पेस्ट ला उन्हात वाळवून एखाद्या बरणीत भरून ठेवावे .रोज रात्री झोपण्या अगोदर या पेस्ट मध्ये २ थेंब लिंबाचा रस व एक मोठा चमचा दूध टाकून चेहऱ्यावर लावावे .
३.अर्धा तासाने थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा ,याने त्वचा उजळते .
-लिंबाचा रस –
हिवाळ्यात बदाम तेलाचे काही थेंब लिंबू रसात मिसळून चेहऱ्याला हा पॅक लावल्याने रंग उजळतो .
-थंडीत हि रहा ताजे
१.आंबे हळद ,जायफळ दुधात किंवा लिंबाच्या रसात उगाळून हा लेप करावा .हा लेप रक्तशुद्धी करणारा आहे .
२.त्वचेवरील काळसरपणा किंवा डाग घालवण्यासाठी या लेपाचा फार उपयोग होतो .
जीवनसत्त्वे –
१.मक्याचे पिठात अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा लिंबे ,संत्री ,मोसंबी यांच्या साली वाळवून त्यांची पावडर करून त्याचा अर्धा चमचा आणि यांची पेस्ट होईल इतके पाणी घालून पॅक तयार करावा .डोळे व ओठ सोडून चेहरा ,मान या भागावर लावून ५ ते १० मिनिटांनी काढावा .
-मसूरच्या डाळीचे पीठ याने रंग उजळतो :
१.आधी चेहरा स्वच्छ धुऊन मसूरच्या पिठाचा लेप लावावा .वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवावा .मसूरच्या डाळीतून चेहऱ्याला पोषण मिळते ,तसेच चेहरा उजळण्यासाठी मदत होते .
-सौंदर्यसाधनासाठी मध हा बहुगुणी :
१.एक चमचा व एक चमचा दुधावरील साय या मिश्रणाने त्वचेवरील कोरडेपणा व त्यामुळे निर्माण झालेल्या सुरकुत्या नाहीशा होतात .
२.दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एकत्र करावी .त्यामध्ये साधारण १० थेंब गुलाब जल ,व १० थेंब लिंबू टाकून त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा .अंघोळीच्या आधी तयार केलेला लेप चेहऱ्यावर साधारण अर्धा तास ठेवावा व नंतर धुऊन टाकावा .
-ज्वारीचे पीठ याने रंग उजळतो :
१.ज्वारीचे पीठ ,हळद आणि मोहरीचे तेल पाण्यामध्ये एकत्र करून उटणे बनवून घ्यावे .या उटण्याने रोज शरीराची मालिश केल्याने फायदा होतो .
मुलतानी माती याने रंग उजळतो :
१.मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्र करून चेहऱ्यावर रोज लावल्यास चेहऱ्यावर रंग निखरतो .
काकडी याने रंग उजळतो :
१.दोन चमचे काकडीचा रस ,अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो .
लिंबाच्या पानामुळे त्वचेची रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते .याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते .साधारण चार -पाच लिंबाची पाने मुलतानी मातीमध्ये एकत्र करून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले बारीक करून घ्यावे .तयार झालेला हा लेप चेहऱ्यावर १५मिनिट लावून ठेवून चेहरा धुवावा .
संत्र्याची साल याने रंग उजळतो :
१.संत्र्याची साल वाळवून चूर्ण तयार करून घ्या .या चूर्णामध्ये थोडेसे कच्चे दूध मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा .थोड्यावेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या .यामुळे त्वचा कोमल होईल .
काजू याने रंग उजळतो :
१.काजू त्वचासाठी उत्तम मानले जातात .काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या .त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा .स्किन ड्राय असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा .सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे आणि काही थेंब टाकून स्क्रब करा .
दूध आणि केसर याने रंग उजळतो :
१.दूध आणि केसर लावल्यानंतर गुलाबाची पाने लावल्याने काळसरपणा कमी होऊन रंग उजळतो .
२.अंघोळीच्यापूर्वी पाण्यात गुलाबाची पाने टाकल्याने हात -पायदेखील उजळतात आणि घामाचा वास दूर होतो .