* स्त्रियांच्या सौंदर्याविषयी *

 *  स्त्रियांच्या सौंदर्याविषयी *


ताजतवानं दिसण्यासाठी –

1.रोज स्वच्छ अंघोळ करा .नियमित केस धुवा आणि चेहरा धुण्यासाठी फेसवॉश चा वापर करा .

2.केस नियमित ट्रिम करून घ्या .त्यामुळे ते दिसतीलही छान आणि केसांची वाढ हि झपाट्याने होईल .

3.मेक -अप करायचा असेल तर लाईट आणि नैसर्गिक शेड्सचा वापर करा .

4.ताजी फळ आणि भाज्या यांचा आहारात समावेश करा .नियमित फळ आणि भाज्या खा .भरपूर पाणी प्या .

यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकली जातील आणि तुमच्या त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळेल .

5.दिवसा सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा .कोणताही मौसम असला तरी सनस्क्रीन टाळू नका .

6.रात्री शांत आणि भरपूर झोप घ्या .कारण चांगल्या झोपेमुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता .झोप  नीट झाली नाही तर चिडचिड होते .

तुम्ही कितीही महागडे उपाय केले ,महागड्या स्पामध्ये गेलात तरीही अपुऱ्या झोपेमुळे तुमचा चेहरा तजेलदार दिसणार नाही .


आय मेकअप उन्हाळ्यासाठी :


1.चेहऱ्याचा सर्वात महत्वपूर्ण भाग म्हणजे डोळे .उन्हाळ्यात वॉटरप्रूफ कॉस्मेटिकचा वापर करावा आणि डोळ्यांचा मेकअप करतांना काही गोष्टी कडे लक्ष द्यायला पाहिजे .

2.आय शॅडो : ब्राउन कलरच्या आय शॅडोने डोळ्यांना डीप सेट करावे आणि तुमच्या ड्रेसच्या मॅचिंग शेड पापण्यांवर लावावे .आयब्रोजच्या खाली ब्राईड क्रिमी गोल्डन किंवा सिल्वर कलरने हायलाईट करू शकता .

3.आय लायनर :

उन्हाळ्यात आय लायनर वॉटरप्रूफ असायला पाहिजे तुम्ही वाटल्यास डोळ्यांच्या खाली पेन्सिल किंवा लायनरचा वापर करू शकता .

आय लायनर आपल्या स्किनटोन आणि ड्रेसच्या अनुरूप ब्राऊन किंवा निळ्या रंगाचे असू शकता .हे रंग उठून दिसतात आणि ड्राय लुक पण देतात .

4.आयब्रोज :

आपल्या आयब्रोजला सुंदर शेप देण्यासाठी आणि त्या ठिकाणी कट किंवा रिकामी जागा भरण्यासाठी ब्राऊन किंवा ब्लॅक पेन्सिलचा वापर करावा .

5.मस्कारा :

उन्हाळ्यात मस्कारा सुध्दा वाटरप्रूफ असायला पाहिजे .आपल्या आवडी नुसार ब्राऊन किंवा निळ्या रंगाचा मस्कारा लावू शकता. तुम्ही पापण्यांवर ट्रांसपरेंट  मस्कारा लावून आवडीनुसार शेप देऊ शकता .


डोळ्याखालील  काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही उपाय :


1.आपल्या डोळ्याखालील  काळी वर्तुळे घालविण्यासाठी काकडीचे गोल काप महत्वाची भूमिका बजावतात ,तसेच डोळ्यांना आरामही मिळतो .काकडीचे काप चांगले क्लिन्झरही आहे .डोळ्याखालील वर्तुळे जाण्यास ते मदत करते .काकडीचे गोल काप करून दिवसातून दोन ते तीन वेळा 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवा .

2.तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप घेत नसाल ,तर त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात .हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या .विश्रन्तीही महत्वाची आहे .त्यामुळे डोळ्यावरील ताण कमी होऊन ते काळे पडणार नाहीत .

3. सकाळी चहा केल्यांनतर चहाचे छोटे कण फ्रिजमध्ये ठेवा .त्यानंतर झाल्यावर डोळ्याखाली हलक्या हाताने चोळावा .त्यामुळे तुम्हाला अराम मिळेल .

4.टोमॅटीतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात . एक चमचा टोमॅटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब ) एकत्र करून मिश्रण तयार करावे .हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे .दोन मिंट तसेच ठेवावे .त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुऊन काढावे.

5.बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत .

डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो .बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यात मदत होते .रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे .हलक्या हाताने मसाज करावा .सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा .


सौंदर्ये मानेचे :

1.सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहरा सुंदर असून चालत नाही तर सर्वांगीण सौंदर्य मिळवण्यासाठी नितळ तेजस्वी चेहऱ्यासोबत नितळ मान ,गळा हे सौंदर्य वाढविण्याचे पूरक काम करतात .

२.सकाळी व रात्री मानेची पुढीलप्रमाणे निगा राखावी ;

क्लिंझिंग मिल्कने कापसाने मान स्वच्छ साफ करावी .यासाठी साधे दूधही वापरता येईल .यामुळे मेकअप ,क्रीम इ.साफ होईल .

चंदन पावडर व मुलतानी माती दह्यात भिजवून मानेला चोळून दहा मिनिटाने धुवावे .

-लिंबूरस ,दूध पावडर ,गुलाबपाणी एकत्र करून मानेला लावावे .वीस मिनिटांनी धुवावे .रेशमी कापडाने मान /गळा हलकेच घासावे .त्वचा स्वच्छ ,तेजस्वी होते .

-बदाम तेल ,कोल्डक्रीम व गुलाबपाणी समप्रमाणात एकत्र करून एक मसाज क्रीम करावे .ती मसाज क्रीम बोटांना लावून हळुवार पणे मसाज करावा .

-ओटचे जाडसर पीठ ,लिंबूरस व दही एकत्र करून मानेला मसाज करावा .तो मसाज केलेला थर अर्धा तास ठेऊन काढावा .नंतर मोईचराईझर लावावे .दही व ओटमुळे मृतपेशी निघून लिंबामुळे थोडा ब्लिचिंग सारखा फायदा मिळतो .


सौंदर्य खुलण्यासाठी मुलतानी माती :

१.सौंदर्य खुलवतांना चेहऱ्याची काळजी घेणे हे खूप महत्वाचे असते .आणि त्यात नैसर्गिकरित्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी मुलतानी माती हा एक महत्वाचा आणि चांगला पर्याय आहे .

२.चेहऱ्यावर मुरुमे झाली असल्यास छोटा चमचा मुलतानी माती व बेसन पीठ ,थोडीसी हळद पूड टाकून हि पेस्ट चेहऱ्याला आठवड्यातून दोन वेळा लावावी .

३.मुलतानी माती लावल्यामुळे चेहऱ्यावरील डाग सुरकुत्या तर नाहीसे होतातच शिवाय यामुळे काही दुष्परिणाम ही नाही होत .

४.मुलतानी मातीने चेहरा स्वच्छ होतो आणि रंग ही उजळतो .उन्हामध्ये काळवंडलेल्या चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्यामुळे चेहरा उजळवून स्वच्छ होतो .

Leave a Comment

en_USEnglish