* स्रियांसाठी घरगुती ब्युटी पार्लर टिप्स *

 * स्रियांसाठी घरगुती ब्युटी   पार्लर टिप्स   *                                                                              

-आपल्या नाजूक चेहऱ्याबाबत काही समस्या उध्दभवल्यास आपण सरळ सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी जातो .मात्र ,आपण हे विसरतो कि आपल्याच घरातील स्वयंपाक घरात सौंदर्यवर्धक वस्तूंचा खजिना आहे .या खोलीत एक नजर फिरवली तर एक ना एक बहुगुणी गोष्टी तुमच्या दृष्टीत पडतील .या वस्तूंचे लेप तयार करून त्याचा उपयोग फेस  पॅक म्हणून करू शकता .


                             *  घरगुती वस्तूपासून फेसपॅक ताराया करण्याची पद्धत :

१.चंदन –

 चंदन उगळून त्यात गुलाब पाण्याचे काही थेम्ब टाकून तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो .चेहऱ्यावरची त्वचा अधिक गुळगुळीत असेल तर चंदनाच्या काही प्रमाणात गन्धक मिसळावे .उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा फेसपॅक चेहऱ्यासाठी अधिक गुणकारी असतो .

२.दही –

एक चमचा हरभरा डाळीच्या पिठात दोन चमचे दही ,दोन थेम्ब मध यांचे मिश्रण तयार करून अर्धा तास तसेच राहू घ्या .सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर लावल्याने आराम पडतो .

३.पुदिना –

हिरवा पुदिना वाटून साधारण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा .त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या .पुदिन्याचा लेप लावल्याने त्वचेची उष्णता हळूहळू कमी होते व तारुण्यपिटिकांचे डागदेखील कमी होतात .

४.सोयाबीन किंवा मसूर डाळ –

एक छोटी वाटी मसूर डाळ किंवा सोयाबीन रात्री  पाण्यात भिजवून ठेवा .सकाळी त्यातील पाणी काढून ते चांगल्या पध्द्तीने वाटून घ्या .त्यात थोडे कच्चे दूध बदाम  पावडर टाकून लेप तयार करा व तो लेप चेहऱ्याला लावा .हा लेप चेहऱ्याला लावल्याने त्वचेमधील कोरडे पणा दूर होतो .

५.उडीद  डाळ –

उडीद डाळीची पावडर तयार करून त्यात गुलाबजल ,ग्लिसरीन व बदाम पावडर मिसळा व लेप तयार करा हा लेप चेहऱ्याला लावल्याने चेहरा प्रसन्न होतो व सुरकुत्या नाहीशा होतात .

६.लोणी –

पाण्यात थोडे लोणी मिसळून तयार झालेला लेप अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या .चेहऱ्यावर लोणी लेप लावल्याने त्वचेचा शुष्क पणा नाहीसा होतो .

७.काकडी –

काकडी मिक्सर मध्ये बारीक करून घ्या .त्यात थोडे दूध टाकून तयार झालेला लेप चेहरा व मानेवर लावा .काही वेळ तसाच ठेऊन धुऊन टाका .त्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होऊन त्वचा मुलायम होते .

८.मुलतानी माती –

एक छोटा चमचा मुलतानी माती घ्या .त्यात एक छोटा चमचा गुलाब पाणी अथवा क्लिनजिंक मिल्क मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा .१०ते १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने ते धुवून टाका .त्याने चेहरा तेजस्वी  दिसतो .


                                 घरगुती ब्युटी पार्लर टिप्स –

Leave a Comment

en_USEnglish