*चेहऱ्यावरील काळे डाग कसे घालवावेत *


१. उन्हामध्ये फिरल्याने चेहरा काळा पडतो आणि चेहऱ्यावर काही विशिष्ट ठिकाणी विशेषतः उंचवट्याच्या ठिकाणी जास्त गडद काळे डाग पडतात .असे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय खूप उपयुक्त पडतात .

२. आपल्या परंपरेने आपल्याला चेहरा आणि त्वचेच्या आरोग्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगितले आहेत .त्यांचा वापर केल्यास चेहरा तजेलदार आणि डाग विरहित होतो .

३. त्यामध्ये प्रामुख्याने काकडी ,मध ,लिंबाचा रस ,हळद ,ताक ,नारळाचे पाणी,बदाम ,यांचा वापर प्रामुख्याने केला जात असतो .

४. हळद आणि चंदन यांच्या वापराबाबत तर लोकांमध्ये खूप खूप उत्सुकता आहे .

५. साखर हि औषधी असू शकेल यावर कोणाचा यावर कोणाचा विश्वास हि बसणार नाही .पण प्रत्यक्षात साखर हि चेहरा स्वच्छ धुण्यास उपयोगी पडते .

६. तीच गोष्ट ताकाची .ताकामुळे चेहऱ्याची चकाकी वाढते .त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरावयाच्या वरील गोष्टींचा वापर करूनच चेहऱ्याला लावण्याकरिता विविध प्रकारचे लेप तयार करावे लागतात .त्यामध्ये सर्वाधिक उपयुक्त ठरणारा लेप म्हणजे काकडीचा रस आणि गुलाब पाणी यांच्या मिश्रणातून तयार होणार लेप .हे मिश्रण दिवसातून दोन वेळा चेहऱ्याला लावावे ,नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा .या मिश्रणात थोडा लिंबाचा रस सुद्धा मिसळावा .

७. लिंबाच्या रसाने चेहऱ्याची कातडी निरोगी होते .त्याचबरोबर काकडी आणि गुलाब पाण्याचा उपयोग चेहऱ्याच्या त्वचेला थंडाई पोचविण्यास कारणीभूत ठरतात .

८. मध आणि लिंबाचा रस यांचेही मिश्रण उपयुक्त ठरते .दोन चमचे मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावरच्या गडद काळ्या डागांवर लावावा .काही मिनिटे हा थरचेहऱ्यावर ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा .चेहरा तजेलदार होतो .

९. हळद हि पूर्वपरंपरेने त्वचेचे सौंदर्ये वाढविण्यास वापरली जात असते .तेव्हा थोडीशी हळद घेऊन तिच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकावा आणि कच्चे दूध मिसळून त्यांची पेस्ट तयार करावी .हा थर चेहऱ्यावर वेळेपर्यंत ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुवावा .

१०. लिंबाचा रस हा नुसता वापरला तरी चालतो .विशेषतः आपल्या शरीराचे घोटे ,कोपरे ,आणि गुडघे अधिक काळे पडतात त्यांना लिंबाचा रस चोळावा आणि पंधरा मिनीटानंतर ते भाग पाण्याने धुऊन टाकावे .तिथली त्वचा सामान्य होते .एकंदरीत हे सगळे पदार्थ त्वचेला तजेला देण्यास उपयुक्त ठरतात .

Leave a Comment

en_USEnglish