*डोळे आणि आहार *

        *डोळे आणि आहार *


१.डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे .देवाने दिलेल्या या सुंदर अवयवांची आवश्यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे .आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकअप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते .हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुध्दा डोळ्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे .


२.डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्वे ,अ ,क व इ ,झिंक ,व सॅलिनियम हि अँटी ऑक्सिडेंट्स ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्यकता असते .हि पोषणमूल्ये अन्नपदार्थातून मिळतात .


३.केशरी ,लाल नारंगी ,रंगाची फळे व भाज्या :जीवनसत्वे ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन ,हे जीवनसत्वे आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे .खूप पूर्वी पासून आपण ऐकत आलो आहोत कि गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे केवळ गाजरच नाही तर केशरी ,लाल ,नारंगी रंगाची फळे व भाज्या यामध्ये हे जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असते .अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो .तसेच रेटिना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुवत पणा येण्याची शक्यता असते .


४. आंबट व बेरी प्रकारातील फळे :

जीवनसत्वे क हे आंबट फळे जसे आवळा ,लिंबू ,संत्री ,मोसंबी इत्यादीमध्ये तसेच स्ट्राबेरी ,श्रजबेरी ,रासबेरी मध्ये पण असते .सर्वसाधारणपणे संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून हि जीवनसत्वे सैनिकासारखे आपले रक्षण करत असतात .डोळ्यांच्या संसर्गापासून रक्षण व मोतीबिंदूची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे काम क जीवनसत्व करते .


५. सुकामेवा :

ई’ जीवनसत्व हे अँटिऑक्सिडेंटचे काम करते .जीवनसत्व अ चे ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवते .आपण जसे घर घासून पुसून साफ करतो ,किटाणूंचा कचऱ्याचा सफाया करतो ,तसेच हे अँटिऑक्सिडेन्ट फ्री रॅडिकल चा सफाया करतात .आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया ,हवेचे प्रदूषण ,सिगारेट ओढणे इत्यादींमुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात .बदाम ,अंड ,वनस्पतीजन्य तेल ई .मध्ये ‘ई ‘ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते .


६. पालेभाज्या :

 हिरव्या पालेभाज्यांमध्ये अम्प्युटिंन ,झॅकसांथीन हे अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात .स्नायूंच्या ऱ्हासाची व मोतीबिंदूची शक्यता कमी करण्यात यांचा महत्वाचा वाटा आहे .स्नायूंचा ऱ्हास हि सर्व वयस्क लोकांमध्ये आढळून येणारी अवस्था आहे .रेटिनाचा मधला भाग काम करेनासा होता .हे टाळण्यासाठी भरपूर पालेभाज्या मिक्स असलेले सलाड खाणे आवश्यक आहे .


७.अंडे :

 अंड्याच्या पिवळ्या बल्कमध्ये कॅरोटीन व ल्युपिन हे दोन्ही डोळ्यांसाठी आवश्यक असलेले पोषणमूल्य असतात .त्यामुळे रेटिना तंदुरुस्त राहण्यास मदत होते .


८.मासे :

 ट्यूना ,साल्मन इत्यादी प्रकारचे मासे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात .ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यासाठी हे मासे ,तसेच आक्रोड ,सोयाबीनची उत्पादने ,या सगळ्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा जातो .डोळे तजेलदार दिसतात .


९.झिंक :

 झिंक हे खनिज मदतनिसाचे काम करते .आपल्या यकृतात साठवलेले जीवनसत्व अ यकृतात डोळ्याच्या रेटिना पर्यंत आणण्याचे काम झिंक हे खनिज करते .काही फळे ,भाज्या व मुख्यत्वे प्राणिज पदार्थ व मासे यात झिंक असते .


१० .समतोल आहार ,नियमित व्यायाम ,वजन नियंत्रणात ठेवणे ,स्वच्छता तसेच पोषकतत्वांचा आहारात समावेश करण्यासोबतच काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे .


डोळे आणि आहार 

Leave a Comment

en_USEnglish