*डोळ्यांची ऍलर्जी व कचऱ्यावर सोपे उपाय व उपचार *
१. दुचाकीवर जाताना संरक्षण हेल्मेट व शून्य नंबरचा चष्मा व गॉगल वापरावा किंवा फोटो क्रोमॅटिक गॉगल्स आपल्या डोळयांचे अतिनील किंवा अल्ट्रा व्हायोलेट प्रकाशापासून देखील संरक्षण करतात .
२. डोळे कायम म्हणजे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ करणे . त्यासाठी एखाद्या खोलगट बशीमध्ये किंवा वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करावी .हा एक अतिशय प्रभावी ,सोपा ,साधा व सुरक्षित उपाय आहे .मात्र पाणी अगदी स्वच्छ असावे . तसेच आपल्या डोळ्यांवर स्वच्छ ,थंड पाण्याचा शिडकावा करावा .यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते व डोळ्यांमधील धूलिकण बाहेर टाकले जातात व एलर्जीचा धोका कमी होतो .
३. डोळे स्वच्छ करण्यासाठी तुरटीच्या पाण्याचा व बोरिक पावडरच्या पाण्याचाही उपयोग केला जातो ,पण तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच .डोळे धुतल्यानंतर ( +ear substitute ) या प्रकारातील डोळयांची औषधें डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत .
४. कोरफडीचा गर किंवा थंड दुधाच्या पट्ट्या डोळ्यांच्या बंद पापण्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो .गुलाबपाणी ,मध ,एरंडेल तेल किंवा त्रिफळायुक्त पाणी याचाही वापर डोळे स्वच्छ करण्यासाठी होतो ,त्यासाठी आयुर्वेदीय सल्ला घ्यावा .कारण कित्येकवेळा भासेल युक्त व दूषित द्रव्येही असण्याची शक्यता असल्याने डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांबाबत धोका पत्करण्यात अर्थ नसतो .
५. पामिंग : दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासून स्थिर विघुत तयार होते .अर्धा मिनटं ,हे दोन्ही तळवे दोन्ही डोळ्यांवर पापण्या बंद करून हळूच दाबावेत व हा उपाय दिवसातून तीन चार वेळा करावा .डोळ्यांमध्ये एखादा कण गेला असे वाटत असेल ,पण नुसतीच संवेदना असेल ,त्या वेळी हि मात्र लागू पडते .