डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

               डोळ्यांची काळजी कशी घ्यावी 


१. सिगारेट ओढू नये 

२.डोळ्यांसाठी उन्हाच्या चष्म्याच्या वापर करा .फॅशन म्हणून नव्हे ,तर सूर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल वापरावा .


३.भरपूर पाणी प्यावे .आपला डोळा पाण्यासारख्या पदार्थाने वेढलेला आहे .आपण जितके वेळा धुळीचे कण व इतर गोष्टी डोळ्यात जात असतात पण हा पातळ पदार्थ आपल्या डोळ्यांचे सतत रक्षण करत असतो व डोळ्याला कोरडेपण जाणवू देत नाही .


४.भडक रंगाच्या भाज्यांचे सलाड आहारात नक्कीच असावे .जसे पालक ,बिट ,कोथिंबीर ,गाजर इ.हे सलाड अनेक गोष्टी एकत्र करून खावे .उदाहरणार्थ भाजी +फळे +थोडा सुकामेवा +कडधान्य +ऑलिव्ह ऑइल इत्यादी एकत्र खावे .


५.डोळ्यांना कटाक्षाने आराम घ्यावा .यासाठी २०-२०-२०चा नियम पाळावा .दर २० मिनिटांनी २० फूट लांबीची वस्तू ,२० सेकंदासाटी पाहावी यामुळे काम करतांना डोळ्यावर येणार ताण हलका होतो व डोळ्याचे आरोग्य राखले जाते .


६.डोळे अधूनमधून ,विशेषतः बाहेरून आल्यावर थंड पाण्याने धुवावेत .


७.कधी कधी धुळीचे ऍलर्जी निर्माण होऊ शकते ,त्यामुळे वरचेवर लाल होणे ,खाज सुटणे असे त्रास होऊ शकतात .यावर डॉक्टरांचा सल्ला औषधोउपचार केले पाहिजेत .


८.डोळे येणे हाही नेहमी होणारा साथीचा आजार आहे .त्यात डोळे लाल होणे ,डोळ्यातून चिकट घाण येणे असे त्रास होतात .हा संसर्ग आजार असल्यामुळे रुग्णाने आपला रुमाल ,टॉवेल वैगरे वस्तू वेगळ्या ठेवाव्यात आणि इतर लोकांच्या संपर्कात येणे टाळावे .दुकानदाराला विचारून औषध घेऊ नयेत .डॉक्टरांचा सल्ला घयावा .


९.आहारात गाजर ,पालक ,मुळा यांचा समावेश असावा .त्यातून’ अ ‘ जीवनसत्व मिळत .


१०.पुस्तक वाचताना ३३ सेमी अंतरावर असावं .त्यावर पुरेसा उजेड असावा .


११.डोळ्यांना मार लागणे किंवा अणुकुचीदार वस्तूने इजा होणे हाही नेहमी घडणार प्रकार आहे .त्यात डोळ्यांच्या रेटिनाला  धक्का लागू शकतो .त्यामुळे डोळ्याला मार लागलेल्या सर्व गोष्टीनी काहीही त्रास होत नसला .तरी डोळे तपासणे गरजेचे आहे  

Leave a Comment

en_USEnglish