* डोळ्यांचे सौंदर्य *
१. डोळे हा चेहऱ्याचा नाजूक आणि मेकअप साठी महत्वपूर्ण भाग आहे .डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी खूप वेळ लागतो .परंतु योग्य पध्द्तीने कमी वेळेत मेकअप करून त्यांचे सौंदर्य वाढवता येते .
२.डोळ्यांच्या दोन्ही पापण्यांवर काजळ लावून त्यावर पांढरे आयलाईनर लावल्यास डोळे अधिक आकर्षित आणि मोठे दिसतात .यासाठी तुम्ही विविध प्रकारचे काजळही वापरू शकता .नंतर डोळ्यांच्या दोन्ही पापण्याजवळ मॉइस्चराइजर लावा .यामुळे डोळे उठावदार दिसतात .आणि मेकअप अधिक वेळ राहतो .
३.डोळ्यांच्या पापण्यांवर प्रथम आयशॅडो आणि नंतर आयलाईनर लावा .आणि पापण्या १५ सेकंद बंद ठेवा .काजळ लावा आणि ते सुकण्यासाठी पुन्हा डोळे बंद करून उघडा आणि पहा डोळे किती आकर्षित आणि उठावदार दिसतात .
४.मोठे डोळे दिसण्यासाठी प्रथम आयशॅडो लावा .नंतर फक्त वरच्या पापणीवर काळ्या रंगाचे आयशॅडोचा उपयोग करा .नंतर आयलाईनर लावून २० सेकंद पापण्या बंद करा .आणि नंतर काजळ लावा ,पुन्हा थोडा वेळ पापण्या बंद करून ठेवा .अशा पद्धतीने कमी वेळेतही डोळ्यांचा मेकअप करून सौंदर्य वाढवता येते .
५.चेहऱ्यावरचे सौंदर्य डोळ्यांच्या सौंदर्यावर अवलंबून असते .यामुळे सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचेही सौंदर्य खुलवायला हवे ,विशेषतः आय प्रायमर ,हायलाईटर ,मस्कारा आणि अशा अनेक गोष्टींच्या साह्याने आपल्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढविता येऊ शकते .मग कसे वाढवायचे डोळ्यांचे सौंदर्य जाणून घेण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत .
६.आय प्रायमर :
आय शॅडोचा रंग गडद होण्यासाठी डोळ्यांचा मेकअप सुरु करण्यापूर्वी आय प्रायमर लावणे आवश्यक आहे .यामुळे पापण्या मऊ होतात व डोळ्यावरील मेकअप दीर्घकाळ टिकतो .
७.हायलाईटर :
डोळे अधिक आकर्षक दिसण्यासाठी भुवयांवरील हाडावर हायलाईटर लावा .यामुळे डोळ्यांना सुंदर आकारही मिळतो व सुंदर दिसतात .
८.मस्कारा :
डोळ्यांना बाहेरच्या दिशेने व वरच्या बाजूने मस्कारा लावल्यास डोळे टपोरे दिसण्यास मदत होते .यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होते .
९.आय लाइनर :
डोळ्यांना हटके लुक देण्यासाठी आयलाइनरची भूमिका महत्वाची ठरते ,यासाठी वेगवेगळ्या शेपच्या आयलाइनरची निवड करू शकता .
१०.कोल पेन्सिल :
बहुतेक महिला कोल पेन्सिलचा वापर करतात ,मात्र आपले डोळे बदामासारखे टपोरे असतील तरच कोल पेन्सिल लावा ,अन्यथा लावू नका ,नाहीतर आपले डोळे छोटे दिसतील आणि आपल्या सौंदर्यात बाधा ठरेल .
डोळ्यांचे सौंदर्य