* डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक खाद्यपदार्थ *

 * डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक  खाद्यपदार्थ *


१.हिरव्या पालेभाज्या :

हिरव्या पालेभाज्या पालकाची पातळ भाजी ,कोबी ,ब्रोकली ,इ .भाज्यांमध्ये कॅरोटिनॉइड असते त्यामुळे डोळ्यांचा रेटिना चांगला राहतो .


२.कांदा लसूण :

लसूण आणि कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते .डोळ्यांसाठी ते अँटिऑक्सिडेंटचे काम करते .


३.सोयामिल्क यात अधिक प्रमाणात प्रोटिन्स मिळते .त्यामध्ये फॅटी ऍसिड जीवनसत्व इ.यामध्ये सूज कमी करण्याचे तंत्र असते .


४.अंडे : अंड्यामध्ये अमिनो ऍसिड ,प्रोटीन ,सल्फर लैक्तीन ,ल्युटीन ,सिस्टीन आणि जीवनसत्व ब -१२ असते .हे सर्व पेशींच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात .


५.गाजर आणि ढोबळी मिरची रस : हिरव्या ,लाल ,पिवळ्या ,नारंगी रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये खूप चांगल्या प्रकारचे पोषण मिळते .यामध्ये अ ,क जीवनसत्व असल्यामुळे अँटिऑक्सिडेंटचे काम करतात .


६.सुकामेवा : सुक्यामेव्यामध्ये अधिक प्रमाणात जीवनसत्वाचे स्रोत आहेत .ज्यामुळे शरीरातील मेदाच्या पातळीचे प्रमाण कमी राखले जाते .


७.डेअरी उत्पादने : दूध ,लोणी ,मलई ,चीझ ,पनीर या सर्व डेअरी उत्पादनांमध्ये जीवनसत्व -अ  खूप प्रमाणात आढळते .जीवनसत्व -अ  च्या कमतरतेमुळे अंधुक दिसायला लागते .


८.मासे -माश्यांमध्ये ओमेगा -३ फॅटी ऍसिड असते .ज्या बारीक बारीक रक्तपेशींना खराब होण्यापासून वाचवते .म्हणून आठवड्यातून किमान दोनवेळा तरी मासे आहारात घ्यावेत .

Leave a Comment

en_USEnglish