* दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय *
१. अनेक लोक चेहऱ्याच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात परंतु दातांकडे दुर्लक्ष करतात . दातांची योग्य पध्द्तीने काळजी न घेतल्यामुळे दातांवर प्लाक जमा होतात . आणि दात पिवळे दिसू लागतात . या व्यतिरिक्त खाण्याच्या काही पदार्थांचा जास्त प्रमाणात उपयोग , वाढते वय किंवा औषधींचे जास्त सेवन केल्यास दात पिवळे होऊ शकतात .
२. तुळस :
तुळशीमध्ये दातांचा पिवळे पणा दूर करण्याची अद्भुत क्षमता आढळून येते . तसेच तुळशीमध्ये तोंड आणि दातांच्या आजारांपासून बचाव होतो . तुळशीचे पान वाळवून घ्या . या पानाची पावडर टूथपेस्ट मध्ये मिसळून घ्या या पावडर ने ब्रश केल्यास दात पांढरे होतील .
३ . मीठ :
मिठाने दात घासण्याचा उपाय प्राचीन काळापासून सुरु आहे . मिठामध्ये थोडासा कोळसा ( लाकडापासून तयार केलेला कोळसा ) मिसळून दात घासल्यास दातांवरील पिवळेपणा दूर होतो .
४. संत्र्याची साल :
संत्र्याची साल आणि तुळशीचे पाने वाळवून घेऊन बारीक पावडर तयार करून घ्या . ब्रश केल्यानंतर या पावडरने दातांवर हलक्या हाताने मालिश करा . संत्री मधील व्हिटॅमिन सी ‘आणि कॅल्शियममुळे दात मोट्या सारखे पांढरे दिसतील .
५. गाजर :
दररोज गाजर खाल्ल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो . विशेषतः जेवण केल्यानंतर गाजर खाल्ल्यास यामधील रेशे दातांची चांगल्या प्रकारे स्वच्छता करतात .
६. लिंब :
लिंबाचा उपयोग प्राचीन काळापासून दात साफ करण्यासाठी केला जातो . लिंबामध्ये दात पांढरे करणारे आणि बॅक्टरीया नष्ट करणारे गुण आढळून येतात . हे एक नैसर्गिक अँटी बॅक्टरील आणि अँटिसेप्टिक आहे . दररोज लिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांचे कोणतेही आजार होत नाहीत .
७. लिंबू :
लिंबू हे एक असे फळ आहे , ज्यामुळे तोंडातील लाळेमध्ये वृद्धी होते . यामुळे हे दात आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहे . एका लिंबाचा रस काढून त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात पाणी मिसळून घ्यावे . जेवण केल्यानंतर या पाण्याने गुळण्या करा . या उपायाने दात पांढरे होतील आणि तोंडातील दुर्गन्धी दूर होईल .
८. बेकिंग सोडा :
बेकिंग सोडा पिवळे दात पांढरे करण्याचा चांगला घरगुती उपाय आहे . ब्रश केल्यानंतर थोडासा बेकिंग सोडा घेऊन दात साफ करा . यामुळे दातांवर जमा झालेला पिवळा थर हळूहळू कमी होईल . बेकिंग सोडा आणि थोडेसे मीठ टूथपेस्ट मध्ये मिसळून ब्रश केल्यास दात पांढरे होतील .
९. स्ट्रॉबेरी :
स्ट्रॉबेरी दात चमकदार बनवण्याचा सर्वात टेस्टी उपाय आहे . स्ट्रॉबेरी मध्ये आढळून येणारे मॅलीक ऍसिड दातांना पांढरे आणि मजबूत करते . स्ट्रॉबेरीचे काही तुकडे घेऊन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळून घ्या . ब्रश केल्यानंतर हे मिश्रण दातांना लावा .
१० . केळ :
केळ बारीक करून पेस्ट तयार करून घ्या . दररोज या पेस्टने १ मिनिट दातांची मसाज केल्यानंतर ब्रश करा . दररोज हा उपाय केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होईल .