* दातांची काळजी *

            * दातांची काळजी * 


१. सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ घासावेत , त्यासाठी मऊ  पावडर किंवा बारीक मीठ वापरावे किंवा कडुलिंबाच्या काड्यांनी दात घासावेत .


२. लहान मुलांसाठी मऊ व लहान ब्रशचा वापर करावा . त्यामुळे दात स्वच्छ राहावयास मदत होते .तसेच आपला श्वास ताजातवाना वाटतो . तोंडाला वास येत नाही . 


३. आपण दिवसभर  जे खातो  त्याचे अन्नकण दाताच्या फटीत अडकून राहतात त्यासाठी रोज सकाळी उठल्यांनंतर आणि झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत .


४. मिश्रीने दात घासू नयेत . दात शक्यतो ब्रशने घासावेत व घासण्यासाठी बाजारात मिळणारे मिळणारे दंतमंजन किंवा टूथपेस्ट वापरावी .


५. कोळसा किंवा राखेने दात घासल्यास दातांची झीज जास्त होते .


६. जेवणापूर्वी नेहमी चुळ भरावी . जेवणानंतर तसेच प्रत्येकवेळी काही खाल्ले किंवा चहा सारखी पेये प्यायल्यावरही चुळा भरून दातांवरून बोटे फिरवून दात स्वच्छ करावेत . तसेच हिरड्यांवरूनही बोटे फिरवावे म्हणजे हिरड्या मजबूत होऊन दात दीर्घकाळ टिकण्यास मदत होते .  


७. आपले तोंड हे वरून सुंदर दिसेल तरी दातांची निगा व स्वच्छता राखणे हे सर्वात महत्वाचे आहे . आपल्या शरीराचे ते प्रवेशद्वार आहे . दात जीभ ,ओठ यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध आहे .


८. चेहरा हा माणसाचा आरसा आहे . भावनांचा गोंधळ चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो मैखिक आरोग्य चांगले नसल्यास दातांचे ,हिरड्यांचे विकार उद्बवतात .


९. दात स्वच्छ न ठेवल्यास त्या ठिकाणी आमल तयार होत व दात किडतात . या कारणामुळे ९५ टक्के लोकांचे दात किडलेले असतात . काहीवेळा त्यामुळे दाताला छिद्रे पडतात . हि छिद्रे भरली नाहीत तर दात लवकर पडतात आणि तो दुखायला लागतो . तेथील रक्तवाहिन्या तुटतात . तेथून रक्त व पु येतो . अशावेळी हिरड्यांचे आधार असलेले हाड घासले जाते .


१० .मनशे विविध पदार्थ खातात . परंतु तोंड धुवत नाहीत . अन्नकण तेथेच अडकून राहतात . मुले काही खाल्ल्यावर तोंड धुवत नाहीत हि वाईट सवय आहे . त्यामुळे हिरड्यांचे विकार उद्बवतात . ब्रश योग्य पध्द्तीने केला पाहिजे . त्यामुळे तेथील वाहिन्या कार्यक्षम होतात . 


११. दाताच्या फटीत अन्नकण अडकून अंमल तयार होते . दातावरील आवरण दातांचे संरक्षण करीत असते .या आम्लांमुळे त्या आवरणांवर वाईट परिणाम होतात . म्हणून प्रत्येक वेळी तोंड धुणे आवश्यक आहे .


१२. ब्रशने आपण दात स्वच्छ करतो .परंतु ब्रश विविध वयाच्या व्यक्तींसाठी वेगवेगळे व योग्य असावेत . 


१३. लहान मुलांसाठी त्यांचे तोंड लहान असल्याने विशेष करून लहान मुलांकरिता तयार करण्यात आलेले  ब्रश उपयोगी पडतात .मोठ्या  व्यक्तींना दात स्वच्छ करतांना आपण ज्याप्रमाणे झाडू फिरवितो त्याप्रमाणे ब्रश आतून बाहेर फिरवावा जेणेकरून अन्नाचे कण बाहेर पडतील .


१४. ब्रश वर खाली या पध्द्तीने फिरविल्यास दातांच्या फटींमध्ये अडकलेले कण निघून जातात . काही वेळा ब्रश खराब होतो आणि आपण तो वापरतच  राहतो . खराब ब्रश मुळे  हिरड्या दुखावल्या जातात . त्यामुळे ब्रश खराब झाल्यावर ताबडतोब फेकून द्यावा . 


१५. एखादा माणूस जवळ येऊन बोलल्यास त्याच्या दातातील दुर्गन्धिमुळे घाणेरडा वास येतो . हा वास टार्टरमुळे येत असतो दात स्वच्छ न केल्यामुळे दातावर टार्टर जमतो . हा थर  काढल्यास दात स्वच्छ होतात वेळीच उपचार न केल्यास रक्त व पु येतो .काही वेळा रक्तक्षयामुळे हिरड्यांमधील घाण साफ करावी . औषधोउपचार घ्यावेत .


१६. लहानपणापासून पालकांनी मुलांच्या दातांची काळजी घ्यावी .पालकांनी दिवसातून दोन वेळा ब्रश करावा . आई वडिलांनी हि सवय स्वतःला लावून घ्यावी व मुलांनाही लावावी .


१७.काही वेळा दुधाच्या दाताच्या बाजूने दुसरा दात येण्यास सुरवात होते . कारण दुधाचे वेळेवर न पडल्यास अथवा हिरडी जड असल्यामुळे कायमचा दात ठराविक वयात वर येण्याचा प्रयत्न करतो .त्यामुळे आपण असे म्हणतो कि दात डबल दात आले .


१८. दुधाचे दात काढून टाकल्यास मग कायमचे दात तिथे सरकतात . लहान मुलांना दूध पिण्यासाठी प्रवृत्त करावे . दुधामध्ये ,कॅल्शिअम असते .बाजरी ,नाचणी ,शेवगा , सीताफळ , रामफळ  यात कॅल्शियम असते . 


१९. तंबाखूमुळे दाताचा कर्करोग होतो . तंबाखूत  रासायनिक पदार्थ आहेत . त्यातील निकोटीन शरीरास अपायकारक आहे . 


२० . लोक जीभ आणि गालाच्या  पोकळीत तंबाखू चुना ,कात , सुपारी ठेवतात . तोंडात निकोटिनचे चट्टे उमटतात . हि सवय बंद केली पाहिजे . 


२१ .काही भागातील लोकांना आपण तोंडात जळती विडी ठेवतांना पहातो . हा जळता  भाग तोंडाच्या आतील बाजूस असतो . तंबाखू जळून रासायनिक पदार्थ तयार होतो . हे कर्करोगाला आमंत्रण आहे .


२२. लोक १५ ते २० मिनिटे दाताला तंबाखू चोळत असतात . त्यामुळे दातावरील आवरण निघून जाते . तोंडातील व्रण  केवळ दुखतातच असे नाही तर ते लवकर बरे देखील होत नाहीत . अशावेळी कर्करोगाची तपासणी वेळीच करून घ्यावी . 


२३. दातांनी बाटलीचे झाकण किंवा कडक वस्तू तोडू नये ,दुखापत होते . 


२४. दात हालत असताना दोऱ्याने किंवा हाताने काढू नये त्यामुळे हिरड्या  दुखतात . दात करू नयेत ,असे केल्याने दातांना हिरड्यांना इजा पोहचते .


२५ . दुधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची काळजी घ्यावी . 

अश्या प्रकारे दातांची काळजी घ्यावी . 

Leave a Comment

en_USEnglish