दातांसाठी घरगुती उपाय

  * दात  पांढरे शुभ्र करण्यासाठी *


१.दात शुभ्र असणे फार गरजेचे आहे . काही जण इतरांविषयी दाताच्या रंगावरून निष्कर्ष काढतात .म्हणून हे उपाय करा आणि पांढरे शुभ्र दात ठेवा .


२. जेवल्यानंतर अनेकदा दातांमध्ये अन्नकण अडकतात .मात्र हे अन्नकण पिनने ,काडीने कधीही काढू नका . यामुळे दातांना इजा होऊ शकते . त्यामुळे असे उपाय करू नका .


३. मोसमी फळे किंवा कच्च्या भाज्यांचा आहारात समावेश करा . कारण शरीराला पौष्टिक सत्व देण्यासोबतच ते दातही पांढरे करतात .


४.गरम खाणे खाल्ल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका . यामुळे जबड्यावर परिणाम होतो . काही वेळेस दात हलू लागतात .


५. दातांच्या मजबुतीसाठी आपल्या आहारात कॅल्शिअम आणि क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थाचा समावेश करा . संत्रे , मोसंबी यांसारखी फळे आणि आवळा , दही ,पनीर ,नारळ ,मोड आलेली कडधान्ये हिरव्या पालेभाज्या यांचा  समावेश करा . 


६. महिलांना मासिक पाळीच्या काळात दातांची खास काळजी घेणे आवश्यक आहे . कारण या काळात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम दातांवरही होऊ शकतो . 


७. जेवल्यावर किंवा काहीही खाल्ल्या नंतर चूळ भरण्याची सवय नक्की घालून घ्या . यामुळे दातात अडकलेले अन्नकण निघून जाण्यास मदत होते आणि दात साफ राहतात .तसेच तोंड उघडल्यावर येणारा अन्नाचा वासही चूळ भरल्यानंतर निघून जातो . 


८. खूप लोकांना ऑफिसमध्ये काम करतांना सतत चहा ,कॉफी पिण्याची सवय असते . पण याच चहा कॉफी मुळे दातांची चमक कमी होते .तसंच त्यावर काळपट थर जमू लागतो . त्यामुळे चहा ,कॉफीचे प्रमाण कमी करा आणि आपल्या दातांची मूळ चमक तशीच ठेवा . 


९. दातांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी फायबर युक्त फळ तसंच गाजर खाणं फारच उपयुक्त ठरत .यामुळे फक्त दातच तंदुरुस्त रहात नाहीत तर हिरड्याची मजबूत बनतात . 


१०. ताज्या श्वासासाठी लवंग ,वेलची किंवा बडीशोप खाणं फायदेशीर ठरते .यामुळे श्वासाला येणारा दुर्गंध निघून जातो .


११. तोंडाच्या सफाईसाठी पाणी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे .पाणी तोंडात धरून त्यानं जोरजोरात चूळ भरली तर ते माऊथवॉश सारखे कार्य करते आणि विषाणूंना तोंडाबाहेर फेकायला मदत होते .


 दातांसाठी घरगुती उपाय 

Leave a Comment

en_USEnglish