* दात किडीवर घरगुती उपाय *
१. दात का किडतात हा प्रत्येक रुग्णांकडून विचारण्यात येणार प्रश्न दात किडणे हे आपल्या सवयी आणि आहार यावर अवलंबुन असते .
२. दातांची नीट काळजी न घेतल्यास वेळोवेळी स्वच्छ न करणे तसेच वेळी अवेळी खाणे यामुळे दातांवर अन्नकण विशेषतः गोड व चिकट पदार्थ साठून राहतात .
३. तोंडातील बॅक्टेरियाच्या संपर्कात येऊन लॅक्टिक ऍसिड नावाचे आम्ल तयार होत . याच आम्लामुळे दाताचा वरचा थर ( इनॅमल ) झिजू लागतो . दाताला खड्डा पडतो . त्यात पुन्हा अन्नकण अडकतात आणि कडी हळूहळू खोल आतल्या थरापर्यन्तच पसरत जाते . जर कीड इनॅमल पर्यंतच असेल तर सहसा दातास फार त्रास होत नाही .
४. लागलेली कीड योग्यवेळेस स्वच्छ करून त्या जागी दातांच्या रंगाचे सिमेंट भरून दात पूर्ववत करता येतो . यावेळेस उपचार न केल्यास कीड खालच्या थरापर्यंत म्हणजे डेंटिनपर्यंत पोहोचते आणि थंड , गोड ,गरम खातांना दात दुखायला लागतो . याही अवस्थेत बरेचदा दातांमध्ये सिमेंट भारत येते .
५. किडलेल्या दातांची वेळीच काळजी न घेतल्यास कीड आतील भागात पसरून दाताच्या मुळापर्यंत पोहचते . तेथील पातळ हाडाचा छेद करून तेथे गळू ( पू ची गाठ ) तयार होते . यामुळे दात ठणकतो , सूज येते , कधी हा दात टिचकी मारल्यास सुध्दा दुखू लागतो . बरेचदा झोपल्यास किंवा खाली वाकल्यावर सुद्धा दात जास्त दुखल्यासारखा वाटतो .
६. या वेळेस दाताचा क्ष – किरण ( एक्स -रे ) काढून दातांची आतील रचना तसेच कीड कुठल्या अवस्थेत आहे हे बघितले जाते . नंतर( रूट कॅनल ) दाताच्या नसेची ट्रीटमेंट करून तो वाचविता येतो . या ट्रीट्मेंटव्दारे दातातील मुळापासूनची कीड काढून त्यात दातांच्या रंगाचे सिमेंट भरून वर सिरॅमिकची टोपी बसवली जाते .
७. दात किडू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी :
१. ब्रशिंग व गुळण्या याव्दारे दात स्वच्छ ठेवावे . रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावेत .
२.दात करू नये . डेंटल फ्लॉस वापरावा . कुत्रिम दातांची योग्य काळजी घ्यावी .
३. खाणे हे सुयोग्य वेळी असावे गोड पदार्थांचे अति सेवन टाळावे . सकस आहार घ्यावा .
४. वेडे -वाकडे दात असल्यास अन्नकण अडकून कीड लागू शकते . तेव्हा दात सरळ करण्याची ट्रीटमेंट करून घ्यावी .
५. एखादा दात काढलेला असल्यास त्याजागी दुसरा दात न बसवल्यास कालांतराने इतर दात त्या जागी सरकतात व कीड लागणे , हिरड्या सुजणे , असे त्रास उद्भवतात .
६. दातांच्या डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणे .
दात का किडतात ,किडू नयेत म्हणून कोणती काळजी घ्याल