*दात दुखीवर आयुर्वेदिक उपाय *

                *दात दुखीवर आयुर्वेदिक उपाय * 


१. आपल्यापैकी प्रत्येकाला दातदुखीचा त्रास कधीना कधी तरी झालेला असतोच . त्यात जर दातात किंवा हिरड्यांमध्ये पू झाला तर त्याची कळ  मस्तकात जाते . दात किडल्याने या जंतू मुळे  दातात किंवा हिरड्यांमध्ये पू होतो . 


२. दात किडल्यानंतरची हि पुढची स्थिती आहे . दात तुटला किंवा त्याचा तुकडा पडल्स तरीही हिरड्या किंवा दातात पू होऊ शकतो . दातांवरचे  आवरण , ज्याला इनॅमल म्हणतात , ते उघडे पडल्यामुळे जंतुना दाताच्या खोलवर शिरकाव करण्यास वाव मिळतो . त्यामुळे हिरड्या किंवा दातांमध्ये पू होतो ,कधी कधी  हा पू दाताच्या मुळातून हाडापर्यंत जाऊन पोहचण्याची शकत्या असते . 


३. पेपरमिंट तेल :

या तेलात काही जंतुनाशक गुणधर्म आहेत . यामुळे दंतरोगावर त्याचा उत्तम उपयोग होतो . हे तेल लावल्याने पू  निर्माण करणाऱ्या जंतूंचा संसर्ग थांबण्यास मदत होते . या तेलामुळे दाह किंवा सूज कमी होते . म्हणून हे तेल हिरड्यांवर लावल्यावर सूज कमी होण्यास मदत होते .


४ . लवंग   तेल :

जंतूंचा नायनाट करण्यासाठी या तेलाचा वापर करता येईल . लवंग  तेल कापसावर घेऊन दातावर लावल्यास दात दुखी कमी होतेच , पण हिरड्यांचे आजारही कमी होतात . लवंग तेल जंतुनाशक , वेदनाशामक असल्यामुळे दातांच्या रोगावर उत्तम इलाज आहे  . लवंग मध्ये अँटिऑक्सिडेन्ट आणि मॅगनीज , तंतुमय पदार्थ आणि ओमेगा ३ असल्यामुळे ते सूज आल्यास त्यावर औषध म्हणून उपयोगी पडते . 


५. लसूण : 

नैसर्गिक जंतुनाशक म्हणून लसूण काम करते . लसणात भरपूर प्रमाणात सूज कमी करणारी आणि जंतुनाशक गुणधर्म आहेत . त्यामुळे किडलेल्या दातांमुळे जंतूंचे वाढते प्रमाण कमी करण्यास मदत करते . लसणामध्ये गंधकाची संयुगे असल्यामुळे ते सूज आणि जंतू संसर्गावर थेट हल्ला चढवून तुम्हाला दुखण्यापासून अराम देतात . 


६. मिठाचे पाणी : 

तुमच्या दातांमध्ये जीवघेण्या वेदना येत असतील , तर घरातले मीठ खायचे मीठ तुम्हाला खूप अराम देऊ शकेल . मीठ सूज कमी करण्यास  आणि वेदनाशामक म्हणून काम करू शकते . त्यामुळे पू झालेल्या दातांचे किंवा हिरड्यांचे दुखणे  कमी करून , संपूर्ण तोंडात होणारा जंतुसंसर्ग रोखते . 


७. हळद : 

प्रत्येकाच्या स्वंयपाक घरात असणारी  हळद , उत्तम जंतुनाशक आहे . त्याशिवाय ती पू होण्यापासून थांबवते . त्यामुळेच कोणत्याही जखमेवर हळद लावली कि जंतुसंसर्ग थांबवता येतो . त्यामुळे पू झालेल्या दातांमुळे होणाऱ्या वेदना  कमी करते . त्याशिवाय तोंडात हिरड्यांना आलेली सूज हि हळदी मुले कमी होते . 


८. बेकिंग सोडा :

हा पदार्थ देखील बहुतेकांच्या स्वयंपाक घरात असतो . त्याचा उपयोग तोंडातल्या लाळेच्या पीएच सामान्य स्तरावर आणण्यास मदत करते . लाळ  दातांना खनिज द्रव्याचा पुरवठा करते . त्यामुळे दात मजबूत होऊन किडीपासून सुरक्षित राहतात . बेकिंग सोडा हा दात स्वच्छ ठेवण्यासाठी उत्तम क्लिन्झर आहे . वरील उपायांनी तुम्ही दात किंवा हिरडी यामध्ये   होणार पू आणि वेदना कमी करू शकता , पण त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे . 


९. खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी व्यवस्थित चुळ  भरावी .


१० . सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत . 


११. खूपच थंड ,गरम ,कडक पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे . 


१२. तुळशीची ५ ते १० पाने स्वच्छ धुऊन वाडीमध्ये किंवा छोट्या उखळीमध्ये घेऊन कुटून त्याचा रस निर्माण करावा  आणि त्यात कपूरच्या ३ ते ५ वड्या  मिसळून घ्यावे . कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे  या मिश्रणात भिजवून दुखणाऱ्या दाढेत ठेवावेत त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते .


१३. दात दुखल्यास दाताला बाहेरून बाजूने (गालावर ) बर्फाचा खडा दाबून धरल्यानेही दात दुखीपासून थोडा अराम मिळू शकतो . 


१४. अचानक दात सुरु झाल्यास अति गरम , अति गार तसेच अति गोड  पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा अन्यथा दुखणे वाढेल . 


१५ . आहाराच्या सवयी बदलणे , भाज्या तसेच फळे भरपूर प्रमाणात खाणे आणि विशेषतः जंक फूड न खाणे ह्याने दात दुखी टाळता येते .  


दात दुखीवर घरगुती उपाय 

Leave a Comment

en_USEnglish