* दात निरोगी ठेवण्यासाठी उपाय *

                * दात निरोगी ठेवण्यासाठी उपाय  *


१. दरवर्षी दंतचिकित्सा  करून घ्यावी . शक्यतो हि चिकित्सा एकाच  दंतवैघाकडून करून करून घ्यावी . 


२. दात दुखायला लागले म्हणजे दातांचे जास्त नुकसान झालेले असते . यामध्ये दातांमधील मांसल किंवा जिवंत भाग दुखावलेला असतो . त्यामुळे उपचार पद्धतीमध्ये मर्यादा येतात . वेळीच काम करून घेतले , तर उपचार पद्धतीचा फायदा पुढे अनेक वर्ष मिळतो .


३. दात निरोगी ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर व झोपण्यापूर्वी दात ब्रशने घासणे अपेक्षित आहे . 


४. दात बोटांनी साफ केल्यास दोन दातांच्या फटींमध्ये अन्नकण ढकलले जातात व त्यामुळे हिरड्यांचे विकार बळावतात . ब्रशने अन्नकण निघून जातात . 


५ . दात निरोगी ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात घासल्यामुळे दातांमध्ये अन्नकण अडकून रात्रभर कुजत नाहीत . त्यामुळे दातांचे व हिरड्यांचे  आरोग्य राखले जाते व हृदयविकारदेखील बळावत  नाही . 


६. दात निरोगी ठेवण्यासाठी ब्रशने कधीही दात आडवे घासू नयेत . त्याने दात हिरडीच्या  जवळ झिजत जातात व हिरड्यांना इजा पोहचते , तसेच दात चांगले स्वच्छही होत नाहीत . 


७. दात निरोगी ठेवण्यासाठी दात ब्रशने गोलाकार पध्द्तीने घासावेत . व हिरडीतून  दातांकडे अशा पद्धतीने घासावेत . 


८. अंगठा किंवा बोटे  तोंडात चोखल्यामुळे वरच्या जबड्याचा  आकार बदलत जातो व तो बाहेर येतो . पण दातांना तारा बसवून दात सरळ रेषेत आणता  येतात . 


९. ओठ चावण्याच्या सवयीमुळे  देखील खालच्या जबड्याची वाढ खुंटते व पर्यायाने येणारे दात वेडेवाकडे येत जातात . 


१० . काहींना जिभेने दात पुढे ढकलण्याची अनेक वर्ष सवय असते . त्यामुळे समोरचे दात बाहेर ढकले  जातात किंवा अनुवांशिकतेमुळे देखील जबड्याचा आकार मोठा व विचित्र असू शकतो . 


दात निरोगी ठेवण्यासाठी उपाय 

Leave a Comment

en_USEnglish