* दात मजबूत करण्यासाठी उपाय *
दात हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा , पण काहीसा दुर्लक्षित अवयव . दातांशिवाय आयुष्य जगणे फार कठीण आहे . दात कमकुवत किंवा दुखत असतील तर आहार घेणे अवगड होऊन बसते . यामुळे दातांची काळजी घेणे आवश्यक आहे ,तसेच योग्य गोष्टीचे सेवन दातांच्या मजबुतीसाठी गरजेचे आहे .
१. कच्चा कांदा :
जर तुम्ही तोंडाचा वास येईल म्हणून कच्चा कांदा खाणे टाळत असाल तर हा समज चुकीचा आहे . कारण दातांसाठी कच्चा कच्चा कांदा फार लाभदायक आहे . कच्च्या कांद्या मुळे दातांना नुकसान पोहचवणारे किटाणू नष्ट होतात .
२. संत्र्याचे ज्यूस :
दररोज एक ग्लास संत्र्याचे ज्यूस पिल्यास शरीराला व्हिटॅमिन ‘सी ‘ आणि कॅल्शिअम मिळते . यामुळे हाड आणि दात मजबूत होतात तसेच बॉडी एनर्जी संतुलित राहते .
३. ओवा :
दररोज जेवण झाल्यानंतर थोडासा ओवा खाणे दातांसाठी लाभदायक आहे .
४. चीज :
चीज आणि पनीर दातांसाठी खूप फायदेशीर आहे . चीज आणि पनीर मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते , जे दातांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे . तुमचे दात किडले असतील तर दररोज चीज किंवा पनीरचा एक तुकडा खावा . दातांची कीड दूर होऊ लागेल .
५. कोको :
कोको दातांसाठी खूप पोषक मानले जाते . यामधील उपस्थित असलेल्या तत्त्वांमुळे हिरड्या सुजणे आणि दाढ किडण्याचा धोका राहत नाही . तुमचा संपूर्ण दिवस स्ट्रेस मध्ये जात असेल तर संध्याकाळी चॉकलेटचा एक तुकडा खाल्ल्यास रिलॅक्स वाटेल आणि दातांच्या आजारातून मुक्ती मिळेल .
६. किवी :
किवी फळ व्हिटॅमिन ‘सी ‘ चे उत्तम स्रोत आहे . शरीरातील संतुलित मात्रा मध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असेल तर कॉलेजन ( त्वचेत असलेले एक प्रकारचे प्रोटिन्स ) चा स्तर कायम राहतो . ज्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहतात .
७. नाशपती :
नाशपती एक रेषेदार फळ असून हे दातांची स्वच्छता तसेच त्यांना शुभ्र आणि मजबूत करण्याचे काम करते .
८. सफरचंद :
हिरड्या आणि दात मजबूत करण्यासाठी दररोज एक सफरचंद खाणे चांगले आहे . सफरचंद खाल्ल्याने दातांची स्वच्छता होते . तोंडातील लाळे मध्ये वृद्धी होते . त्यामुळे दातांमध्ये कीड निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया नष्ट होतात .
९. तीळ :
तीळ चावून खाणे दातांसाठी लाभदायक आहे . तितीळामधील असणाऱ्या कॅल्शिअम मुळे दात मजबूत होतात तसेच दातांमध्ये जमा झालेले प्लाक , कॅल्क्युलस , अन्नकण या सर्वांपासून मुक्तता मिळते .
१० . दूध :
दररोज एक ग्लास दूध पिल्याने दातांना खूप लाभ होतो . दात मजबूत आणि पांढरे होतात . दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते .
११. शुगर फ्री चिंगम :
शुगर फ्री चिंगम चावून खाणे दातांसाठी खूप फायदेशीर मानले जाते . शुगर फ्री चिंगम खाल्ल्याने हिरड्या साफ होतात आणि दातांचा व्यायाम होतो .
१२. पाणी प्या :
दररोज कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे . भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने फक्त शरीरातील विषाणू तत्व बाहेर पडत नाहीत तर दात किडण्याची समस्या दूर होते .
दातांना मजबूत बनविण्यासाठी उपाय