*दृष्टी कमी होण्याची कारणे व उपाय *
१.आजकालच्या बदलत्या आणि अनियमित जीवनशैली मुळे बऱ्याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार आहे .चुकीचा आहार आणि अति कामाचा ताण यामुळे बरेच जण त्यांच्या डोळ्यांची निगा योग्य प्रकारे ठेवत नाही .तुमच्या डोळ्याची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत .या टिप्समुळे नक्कीच तुमच्या डोळ्यांना अराम मिळेल
२.डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची कारणे :
३.धूळ आणि धूर :
आपल्या आजूबाजूचे वातावरण खूप जास्त प्रदूषित झाले आहे कामाच्या ताणामुळे आज बरेच जण बराच वेळ घरातून बाहेर असतात .या दरम्यान डोळ्यांना धूळ आणि धूर यांचा सामना करावा लागतो .याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो .
४. उशिरा झोपणे :
रात्री उशिरा पर्यंत लाईट मध्ये वाचणे ,मोबाईलवर गेम खेळणे ,टीव्ही बघणे अथवा कॉम्पुटर वर जास्त वेळ काम करणे यामुळे देखील डोळे कमजोर होतात .
५.कडक उन्हात बाहेर पडणे :
गॉगल न लावता कडक उन्हात बाहेर पडल्याने डोळ्यांना नुकसान होण्याची दाट शक्यता असते .
६.वेग -वेगळे प्रोडक्ट लावणे :
डोळ्यांना सजवण्यासाठी बरेच जण वेग -वेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर करत असतात .या प्रोडक्ट्मधील केमिकल्स मुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते .
७.चुकीचा आहार :
पौष्टिक आहार हा रोजच्या आहारात घेणे गरजेचे आहे .याचे आहारातील प्रमाण कमी झाल्यास डोळ्यांची दृष्टी अंधुक होण्याची शक्यता असते .
८.दृष्टी वाढविण्यासाठी या गोष्टी करा :
९. पाण्याने डोळे धुवा : पाण्यामुळे बरेच फायदे होतात .तुम्ही जर अधिक बाहेर फिरत असाल तर वेळो -वेळी पाण्याने डोळे धुतल्यास आराम मिळेल . यामुळे डोळ्यांचे डिहायड्रेशन होणार नाही .तसेच डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल .सारखे डोळे धुण्यामुळे डोळ्यांवर येणार ताण कमी होण्यास मदत होते .सकाळी उठल्यावर पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते .
१०. डोळ्यांना आराम मिळेल असा व्यायाम करा . दोन्ही हात एकमेकांवर चोळून ते गरम झाल्यावर डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो .
११.पूर्ण झोप घ्या :
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पर्याप्त झोप आवश्यक असते .कमी झोप घेतल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात .तसेच डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची शक्यता असते .पूर्ण झोप घेतल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते तसेच डोके दुखत नाही .
१२.ब्रेक घ्या :
तुम्ही डोळ्यांवर ताण पडणारे काम करत असल्यास थोडासा ब्रेक घ्या .यामुळे डोळ्यांना आराम मिळेल आणि आरोग्य उत्तम राहील .
१३.नियमित डोळ्यांची तपासणी करा :
तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास जरी होत नसला तरी वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्या .या तपासणीमुळे तुमच्या डोळ्यांची योग्य प्रकारे निगा राखली जाईल आणि काही निदान झाल्यास त्यावर उपचार करता येतील .
१४.दूरच्या वस्तू पहा :
आपण साधारण जवळच्या वस्तू सहज बघतो .परंतु लांबच्या वस्तू बघण्याची सवय डोळ्यांना झाली पाहिजे डोळ्यांची दूर दृष्टी चांगली राहावी यासाठी अधून -मधून लांबच्या वस्तू बघण्याची सवय करा .
१५.डोळ्यांचा मेकअप काढा :
झोपण्या आधी डोळ्यांना केलेला मेकअप काढा .रात्री झोपताना डोळ्यांना मेकअप ठेवणे धोक्याचे असते .यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची दाट शक्यता असते .मेकअपमुळे डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता असते .
१६.सनग्लास वापर :
बाहेर जाण्याआधी डोळ्यांवर सनग्लास जरूर लावा .याने डोळ्यांवर पडण्याऱ्या पराबैंगनी किरणांपासून बचाव होईल .शक्यतो सनग्लास चांगल्या क्वालिटीचे वापरावे .