* महिलांना हाताचे सौंदर्य खुलवण्यासाठी अलंकार *

 * महिलांना हाताचे सौंदर्य  खुलवण्यासाठी अलंकार * 


१. हात म्हणजे बाहु , भुजा . या अवयवावर तीन ठिकाणी अलंकार घालण्याची रूढी आहे . पहिली जागा म्हणजे म्हणजे दंड  . त्यानंतर मनगट आणि शेवटी हाताची बोटे स्रियांच्या बाबतीत या तिन्ही जागा विविध अलंकार दृष्टीस पडतात . पुरुषांच्या किंवा मुलांच्या ( शिशूंच्या ) हातावर एवढे दागिन्यांचे ओझे नसते . स्त्रीयांचे दंडावर दागिने असे आहेत . 


२. ताळेबंध :

हा दंडावरील चांदीचा अलंकार असून नागरजनांपेक्षा ग्रामीण भागातील स्त्रीयांमध्ये  तो अत्यंत लोकप्रिय आहे आणि ‘तोळबंदी ‘ , ‘तुळवंदि ‘ अशा काहीशा अपभ्रष्ट नावांनीच तो ओळखला जातो . 


३. नागोत्र :

नागाच्या वेटोळ्यांप्रमाणेच दंडाभोवती रचना केल्याप्रमाणे दिसणारा हा अलंकार आहे ग्रामीण भागात तो चांदीचा असून ठसठशीत दिसणारा असा असतो , तर शहरी भागात तो सोन्याचा व अधिक नाजूक कलाकुसरीचा दिसतो . या दागिन्याला ‘ नागावाकी ‘ , ‘नागोत्तर ‘ अशीही नवे आढळून आली  . 


     * मनगट * 

१. जवे : 

जव किंवा यव धान्याच्या दाण्याच्या आकाराचे सोन्याचे मणी  सोन्याच्या बांगडीवर चिकटवून या बांगडीला उठाव आणला जातो , त्या अलंकाराला ‘ जवे ‘ असे नाव आहे . हा मुळात गुजरात – राजस्थान कडील  अलंकार आहे . आपल्याकडे फारसा अढळ नाही . गुजरात ‘जवे ‘ आणि पिछोड्या अशी जोडी असते . 


२. गजरा :

हा मोत्यांची सर एकत्र बांधून मनगटावर घालण्याचा अलंकार महाराष्ट्रात सर्वत्र रूढ नसला तरी अनेक ठिकाणी पाहावयास मिळतो .


  * हाताची बोटे * 


१. भोरटी  :

सोन्याच्या गोल वळ्याला सोन्याचेच बारीक तारेने संपूर्णपणे गोल गोल वेढे देऊन तयार केलेली अंगठी  . 


२. आरसी : 

हा उत्तर भारतातून इकडे आलेला खास स्रियांसाठी असणारा अंगठीचा प्रकार आहे . आरसी म्हणजे आरसा आरसा असलेली अंगठी . एका वळ्याला  दर्शनी भागावर जडवलेली छोटीसी गोल आकाराची सोन्याची डबी आणि तिच्या झाकणावर तसाच छोटा गोल आरसा अशी या अंगठीची रचना असते . हि अंगठी फक्त  डाव्या हाताच्या अंगठ्यावरच घालावयाची अशी पध्द्त आहे . या डबीत सिंदूर किंवा कुंकू ठेवलेले असते . ऐन  प्रसंगी , गरजेच्या वेळी या डबीतुन कुंकू काढून व वरच्या आरश्यात पाहून ते कपाळी लावायचे यासाठी खास सुविधा म्हणून  हि अंगठी . 


३. घोडा अंगठी :

हि एक अगदी वेगळ्याच प्रकारची अंगठी ग्रामीण समाजामध्ये दिसून येते . विशेषतः कोकण -दाभोळ भागात त्याचप्रमाणे बारामती , अहमदनगर  या भागातील ग्रामीण जनतेमध्ये तिचा वापर असल्याचे जाणवले . 


Leave a Comment

en_USEnglish