* हातपाय गोरे होण्यासाठी उपाय *

         * हातपाय गोरे होण्यासाठी उपाय * 


१. कोणत्या महिलेला सुंदर दिसायला आवडत नाही . आणि त्यासाठी आपण पार्लर मध्ये जाऊन बरेच उपाय करतो . पण तुम्ही कधी तुमच्या हातांकडे लक्ष दिलय का ?  तुम्हाला तुमच्या हातांची त्वचा सुंदर , चमकदार हवी आहे , तर मग हे घरगुती उपाय करा . 


२. तुमच्या हाताची त्वचा खरखरीत असेल तर गरम पाण्यात हात ठेवा आणि हात सुकवून त्यावर बदाम तेल लावा . तसेच हातावर जास्त रेषा असतील तर बटाट्याचा रस हातावर घास . 


३. उन्हामुळे तुमच्या हातावरचा भाग काळा झाला असेल तर एक चमचा काकडीचा रस , एक चमचा टोमॅटोचा रस , त्यात ३ -४ थेंब  लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करा . आणि हातावर लावा असे दररोज केल्याने हात गोरे व मऊ होतील . 


४. अर्ध लिंबू कापा  हातावर एक चमचा साखर घेऊन घासा  , जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही , तोपर्यंत करा . असं केल्याने हाताचा खरखरीत पणा , काळेपणा दूर होतो . 


५. रात्री  झोपताना एक चमचा दूध  मलई  मध्ये २-३ थेंब लिंबाचा रस किंवा ग्लिसरीन घालून ते हातावर लावल्याने त्वचा सुंदर  आणि स्वच्छ होते . 


६. हाताची आणि नखांची काळजी घेण्यासाठी  दररोज पौष्टिक आहार घ्यावा . 


७. खरखरीत हात मऊ करण्यासाठी एक मोठा चमचा दही , त्यात एक छोटा चमचा बदाम पावडर घालून त्याचे मिश्रण हाताला लावा . त्यानंतर अर्ध्या तासाने हात धुऊन टाका .  


हात सुंदर आणि मुलायम करण्यासाठी घरगुती टिप्स 

Leave a Comment

en_USEnglish