* हातापायाचे सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपाय *

     *   हातापायाचे सौंदर्य वाढविण्यासाठी  घरगुती उपाय *


१. पपईचा गर चोळल्याने ही  हात व पायांचा काळेपणा कमी होऊ शकतो . 


२. उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचं पीठ दुधात कालवून हातांचा मसाज करावा हा उपाय केल्याने हातांचा काळेपणा नाहीशा होतो . 


३. लिंबाचा रस कोपरे व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीशा होतो . 


४. थंडीच्या दिवसात हाता  – पायांना  लवंग तेल ,बदाम तेल , कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्याचा मऊ  पणा  टीकून राहतो . 


५. आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून १० मिनिटे त्यामध्ये पाय ठेवावेत . नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा . त्यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्य हि वाढते . 


६. पायांना भेगा असल्यास ग्लिसरीन किंवा लिंबू रसाचे मिश्रण भेगांना रोज रात्री लावल्यानेही फायदा होऊ शकतो . 


७. तळव्यांची त्वचा पातळ असल्याने तिची योग्य ती काळजी घेतली नाही तर ती सुरकुतते . सततच्या डिटर्जंट किंवा भांडी घासण्याचा  साबणाचा वापर झाल्यानेही त्वचा खराब होते . थंडीत तर जास्त त्वचा खराब होते . 


८. बेसिन जवळ एका बाटलीत ग्लिसरीन + लिंबाचा रस + गुलाबपाणी  एकत्र करून ठेवा . प्रत्येक वेळी हात धुतल्यावर थोडेसे हातावर चोळा . 


९. हातांची साले निघत असल्यास कोमट पाण्यात मक्याचे पीठ मिसळून ५ मिनिटे  लावून ठेवा . रोज ५ ते १० मिनिटे केल्यास फरक पडेल  . 


१० . हाताला स्क्रब म्हणून साखर + लिंबू रस  हातावर चोळा . म्हणजे हातावरील मृत त्वचा निघून जाईल व हात कोरडे पडणार नाहीत  . 


११. कांदा  भाजून त्याची पेस्ट करून ती भेगांवर लावा . भेगा भरून येतील . 


१२. काळवंडलेल्या हातांसाठी ३-४ कपूर वड्या + १ चमचा दही हे मिश्रण अंघोळीच्या आधी १५ -२० मिनिटे लावून ठेवा  आणि आंघोळीच्या वेळी धुवा  . 


१३. रापलेल्या कोपऱ्यांसाठी पिकलेला  टोमॅटो चोळा  . १५ मिनिटांनी धुवा . 


१४. रात्री झोपण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन क्रीम किंवा बॉडी लोशन लावावे . शक्य असल्यास त्यावर मोजे घालावेत . नियमित काळजी घेतल्यास , त्यावर आलेल्या मृत त्वचेचा थर  मागे केल्यास , चुकीच्या किंवा अतिप्रमाणात प्रसाधनांचा वापर न केल्यास आपण नखांना आरोग्य देऊ शकतो . 


१५. आंघोळ करण्याआधी  कोमट दुधाने हातांना मालिश केली पाहिजे , त्याने हाताच्या त्वचेत निखार येतो . 


१६. गरम पाणी व गर पाणी असे एकाआड एकदा पाय बुडवावेत व काढावेत . शेवटी गरम पाण्यातून काढावेत . टाचांच्या जाड  त्वचेतील रक्तभिसरण सुधारल्याने टाचा दुखणे कमी होते  . 


१७. टोमॅटोचा रस , लिंबाचा रस आणि कच्चे दूध एकत्र करून त्याचे मिश्रण हातांवर चोळले पाहिजे . त्यामुळे हातांचा रंग उजळेल . 

Leave a Comment

en_USEnglish