* हाता – पायांची काळजी कशी घ्यावी *

     * हाता – पायांची काळजी कशी घ्यावी  *


१. चेहऱ्यापेक्षाही हातापायाचे हाल थंडीत फारच होतात . टाचा , गुडघे , कोपरे , घोटे हे इतर वेळी कोरडे असणारे शरीराचे भाग शरीरातील पाण्याच्या अभावाने अधिकच काळे पडतात . त्यांना भेगा पडतात . 


२. आपण त्याला क्रीम व तेल लावून मऊ ठेवण्याचा प्रयत्न करतो , पण त्यापेक्षाही शरीरातील पाणी टिकवून ठेवणाऱ्या क्षाराचा विचार या ऋतूमध्ये होणे आवश्यक आहे . 


३. हे काळे पडलेले अवयव मळले आहेत म्हणून परत परत साबणाने धुण्याचा वेडेपणा बऱ्याच जणी करतात , पण त्यामुळे उलट त्वचा अधिकच कोरडी पडून शुष्क होते . अशा वेळी जर दुपारी उन्हात जाण्याची वेळ येत असेल तर हाताच्या बाहेरच्या भागही काळा  पडतो व तो जवळजवळ कायमचा राहतो . 


४. त्यामुळे थंडीचा ऋतू हा त्वचेची , शरीराची उत्तम काळजी घेण्यासाठी घालवावा . चेहऱ्यासाठी क्लींजिंग  ,स्वच्छता ,टोनिंग – संरक्षण व नरिशिंग संवधर्न हा सौंदर्याचा गुरुमंत्र कायमचा लक्षात ठेवा . 


५. चेहरा , हात , पाय शरीर या प्रत्येकाच्या सौंदर्यासाठी हाच गुरुमंत्र आहे .


                       – त्यावर उपाय –


१. थंडीसाठी कश्याचा वापर करून आपण थंडीचा सामना  करायचा . स्वच्छता , तीव्र सोडा असलेल्या , अल्कली पदार्थांचा  वापर शक्यतो थंडीमध्ये टाळावा . कारण त्वचेवरचे तेल व पाणी ( मॉइश्चर ) या पदार्थाने काढून टाकले जाते  व त्याची त्वचेला थंडीत अत्यंत आवश्यकता असते . 


२. तेव्हा शरीराला बेबी सोप किंवा ऍसिडिक फेसवॉश याचा वापर करणे योग्य आपणही खडेमिठाचा शरीरासाठी क्लिन्सर बनवू शकता  . 


३. चणा  , उडीद ,मसूर या डाळीचा जाडसर रवा काढून त्यात खडे मीठ मिक्सर मधून हलके फिरवून मिसळावे . आयत्या वेळी चमचाभर  मीठ वरील डाळीच्या रव्यात घालून ५/१० मिनिटे भिजवून संपूर्ण शरीराला घासून धुण्यासाठी वापरावे  . 


४. तसेच वेळ असेल तर या मिश्रणाचा पॅक करून तळपाय , पाय ,हात यांना पाच मिनिटे लावून ठेवा . नंतर अंघोळीच्या वेळी  किंवा इतर वेळी गरम पाण्याने घासून धुवावे . फक्त मीठ हे आयत्या वेळी घाला , आधीपासून डाळीच्या रव्यात घालून  ठेवू नका . 


५ . नितळ त्वचेचे सौम्य स्वच्छता हे गुपित आहे . हळद , चंदन , चणा  वा  कोणत्याही डाळीचे पीठ एक भाग व केमिस्टकडे मिळणारी फुलर्स अर्थ दोन भाग करून मिश्रण एकत्र करून बाटलीत भरून ठेवा . 


६. आपल्याला हवे तेवढे मिश्रण अंघोळीपूर्वी काढून त्यात पाणी किंवा दह्यावरचे पाणी यातील काहीही घालून ठेवा . 


७. संपूर्ण कुटुंबासाठी बाथरूम मध्ये असे मिश्रण भिजवून ठेवाल  तर हिवाळ्यातील सौंदर्यपूर्ण स्वच्छता होईल . 


८. जमेल तर ५ / १० मिनिटे लेपासारखे हे मिश्रण लावून ठेवावे , मग घासून धुवावे . मिश्रण पातळ भिजून ठेवणे आवश्यक त्वचेवरील कोरडे त्वचा थर  काढून टाकणे हे स्वच्छतेचे महत्व आहे  . 

Leave a Comment

en_USEnglish