* ओठांवरून ओळखा शरीरात नकळत वाढणाऱ्या समस्या *

 * ओठांवरून ओळखा शरीरात नकळत वाढणाऱ्या समस्या * 


१. पाऊट देऊन फोटो किंवा सेल्फी काढला तर त्यावर तुम्हाला पटापट लाईक्स मिळतात . पण तोच पाऊट  म्हणजेच ओठ तुमच्या आरोग्याबाबत अनेक संकेत देतात . 


२. सुकलेले आणि निस्तेज ओठ शरीरातील काही समस्यांबाबत तुम्हाला माहिती जाणीव करून देत असते . 


३. फाटलेले ओठ :

तुमच्या आहारात पोषणद्रव्याची कमतरता असल्यास त्याचा परिणाम ओठांवर दिसून येतो . अचानक ओठ सुकलेले  आणि फाटलेले आढळल्यास , वेदना जाणवल्यास शरीरामध्ये झिंक आयर्न , व्हिटॅमिन बी ‘ ३ आणि बी ‘ ६ यांची कमतरता असण्याची शक्यता असते . 


४. पुळी  :

सर्दीच्या त्रासानंतर  अनेकांच्या ओठांवर वेदनादायी पुळी   आढळते .  शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे ते एक लक्षण आहे . 


५. सुकलेले ओठ :

केवळ वातावरणातील बदलामुळे ओठ सुकतात असे  नाही तर शरीर डिहायड्रेट झाल्याचे म्हणजेच पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास  ओठ सुकतात . 


६. फोड :

काहींच्या ओठांवर वरचेवर फोड येण्याची समस्या आढळते . अतिप्रमाणात कष्ट करणाऱ्यांमध्ये हा त्रास आढळून येतो . ओरल कॅन्सरमध्ये ओठांवर कोठेही फोड आढळून येऊ शकतो . त्याचे निदान सुरवातीच्या टप्प्यावर करण्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या . 


७ , सुजलेले ओठ :

मुलींचे ओठ सुजण्यामागे लीप बाम किंवा लिपस्टिक असू शकते . ऍलर्जिक रिअक्शन मुळे  ओठांवर सूज येऊ शकते  .काही वेळेस खाण्यामध्ये चुकीचे किंवा त्रासदायक पदार्थ आल्यास रिअक्शन दिसून येते . 


८. ओठांच्या टोकांवर चीर पडणे :

झोपेत लाळ  गळण्याची  समस्या असल्यास ओठाच्या टोकाशी क्रॅक्स / चीर पडण्याची शक्यता असते . सतत बाहेर पडणाऱ्या लाळेमुळे  ओठांच्या टोकाशी यीस्ट इन्फेक्शन वाढते . त्याचे प्रमाण वाढल्यास चीर पडते . 

 

Leave a Comment

en_USEnglish