* ओठ काळे पडल्यास घरगुती उपाय *
१. रात्री झोपतांना गायीच्या दुधात लोणीत केसर मिसळा आणि ते ओठांना लावा . ओठ काळे पडले असतील तर फायदा होईल .
२. झोपण्यापूर्वी बदामाचे तेल ओठांवर लावा . ओठांचा रंग उजळण्यास मदत होईल .
३. मलई मध्ये चिमूटभर हळद टाकून ओठांची मालिश केल्यास ओठांचा कोरडेपणा दूर होतो .
४. रोज कमीत कमी जास्तीत जास्त पाणी प्या . त्यामुळे ओठ काळे आणि कोरडे पडत नाहीत .
५. बीटचा रस ओठांवर लावल्याने लिपस्टिक लावण्याची गरज पडणार नाही . आणि रोज काकडीचा रस लावल्यानेही फरक पडतो . ओठांचा काळेपणा दूर होतो .
६. जर तुमचे ओठ वेळ कोरडे राहत असतील तर त्यांना जीभ लावणे टाळा . या सवयीमुळे ओठ अजूनच काळे पडण्याची शक्यता असते . सोबतच ध्रुम्रपानाची सवय टाळा . म्हणजे ओठांबरोबर तुमचे आरोग्यही सुधारण्यास मदत होते .