*ओठ मुलायम ठेवण्यासाठी घरगुती उपाय *

    * ओठांची  काळजी  कशी घ्यावी * 


१ . ओठांचा आखीव , रेखीव  आणि ठसठशीत आकार खुलविण्यासाठी ओठांच्या  मधल्या बाजूला भडक रंग लावा  आणि कडांना हलक्या रंगाचे लिपस्टिक लावावे . 


२. ओठ दाताने कुरतडण्याच्या  सवयीमुळे ओठांच्या त्वचेला हानी पोहचते . ओठांचे पापुद्रे निघतात , भेगा पडतात , त्वचा खेचली गेल्याने त्यातून रक्त येते , ओठ राठ दिसतात . यासाठी ग्लॉसी लिपस्टिक वापरून ओठांना ओलावा मिळवता येईल किंवा लीप बामचा वापर करता येईल . हे पारदर्शी रंगाचेही असते . 


३ . सकाळी ,रात्री ब्रश करताना तो ब्रश ओठांवरून फिरवावा ,त्यामुळे ओठावरील मृत त्वचा निघून जाईल . लोणी आणि मीठ एकत्र करून ओठांना मसाज केल्यामुळेही  ओठांवरील मृत त्वचा निघून जाते . 


४ . चेहरा आणि ओठ अतिशय लहान असल्यास लिपस्टिक ओठांच्या कडांच्या पलीकडे जाऊन थोडी बाहेर पर्यंत लावावी , ओठांवरील लिपस्टिक कडण्यासाठी नेहमी क्लिंझिंग मिल्क चा वापर करावा  . 


५ . लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर थोडीशी पावडर लावावी , त्यानंतर लिपस्टिक लावावी , ह्यामुळे लिप्सटिक बऱ्याच वेळ टिकण्यास  मदत होईल व ओठ सुंदर दिसतील .


६ . शेंगदाण्याच्या तेलाने ओठांवर मसाज करून नंतर सुटी कपड्याने  पुसून घ्या ओठ नरम होतील . 


७ . साखरेच स्क्रबिंग :

ओठांवर साखर आणि मध एकत्र करून स्क्रबिंग करावं  . हे मिश्रण ओठांवर चोळल्याने मृत त्वचा निघून जाते आणि  ओठातील ओलावा टिकतो . 


८. मधाच माइश्चरायझिंग :

मध हे नैसर्गिक माइश्चरायझर आहे तसेच यामध्ये जंतू रोधक गुणधर्मही आहेत . दिवसातून दोन वेळा ओठांवर मध लावल्यास  चीर पडण्याचा त्रास कमी होतो आणि ओठांचं सौंदर्य खुलते  . 


९ . गुलाबाच्या पाकळ्या :

सुबक ओठांना गुलाबाच्या पाकळीची उपमा दिली जाते . आता याच गुलाबाच्या पाकळ्या ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरता येतात . गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात . या पाकळ्यांची पेस्ट करून ओठांवर लावावी आणि १५ मिनिटानंतर गरम पाण्याने ओठ धुवावेत . यामुळे ओठांचं सौंदर्य वाढत . 


१० . थंडीत त्वचेच्या शुष्कतेमुळे हा त्रास होतो . अशा परिस्थितीत ओठ फुटण्याचा , त्वचा उलण्याचा त्रास होण्याची शक्यता असते . या वेळी ओठांवर भेगा पडतात , शुष्कता वाढते आणि ओठांची जळजळ होते . 


११. गरम किंवा तिखट खाताना वेदना जाणवतात . ग्लिसरीन अथवा एखाद क्रीम लावून तात्पुरता आराम  मिळतो . मात्र या त्रासावर काही घरगुती उपचार जास्त परिणाम कारक  ठरतात . म्हणूनच शुष्कता कमी करून ओलावा टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत . 


१२ . आपले ओठ अधिक सुंदर दिसावेत यासाठी महिला लिपस्टिकचा वापर करतात . मात्र ,लिप्स्टीकमध्ये असलेल्या केमिकल्समुळे ओठांवर याचा दुष्परिणाम होऊन ओठ काळे पडतात . 


१३ . ओठ फाटलेले आणि सुकलेले असतील तर , आपल्या चेहऱ्याची चमक निघून जाते अशा ओठांना कितीही लीप बाम लावला  तरी ओठांमध्ये नैसर्गिक चमक दिसत नाही . अशा वेळेस ठोस उपाय योजना करणे गरजेचे असते . 


१४ . बाजारातील महागड्या लीप स्क्रबर वर पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरीही उत्तम लीप स्क्रबर बनवू शकता . आलं ,मध आणि साखर यांचा वापर करून हे लीप स्क्रबर बनवले  जाते . 


१५ . साखर आणि मध प्रत्येकी एक चमचा घ्यावे . यात आल्याचा एक तुकडा बारीक कापून टाकावा हे मिश्रण व्यवस्थित मिसळून  जेलप्रमाणे नियमित ओठांना लावावे . 


१६ . हे जेल ओठांना लावल्यावर हलक्या हाताने गोलाकार मसाज करावा . यानंतर काही वेळाने ओठ धुवावेत . यामुळे  ओठ अधिक मुलायम होऊन चमकदार बनतील . 

Leave a Comment

en_USEnglish