* ओ ठ कोरडे पडणे *

     * ओ ठ कोरडे पडणे  *


१. ओठ कोरडे पडणे हि सर्व सामान्य समस्या आहे . अशा परिस्थितीत ते कोरडे पडू नयेत म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे , हे माहिती असणे गरजेचे आहे . 


२. कोरडे ओठ सतत ओलसर ठेवणे महत्त्वाचे असते , पण तेही विशिष्ट पध्द्तीनेच होणे महत्त्वाचे असते . म्हणूनच ओठ कोरडे पडण्यापासून वाचावे यासाठी काही टिप्स . 


३. ओठांवरून वारंवार जीभ फिरवणे ही अनेक जणींची अगदी सामान्य सवय असते . अशी सवय असल्यास ती टाळण्याचा प्रयत्न करावा . वारंवार जीभ फिरवल्याने ओठ जास्त कोरडे पडतात . 


४. मग ओलसरपणा टिकून राहण्यासाठी काय करायचे ? चांगल्या गुणवत्तेचा लीप बाम वापरा . एखाद्या चांगल्या कंपनीचा फ्रुटी लीप बाम ओठांसाठी वापरा . कारण यामुळे ओठ ओलसर आणिमुलायम राहतात . हा लीप बाम थोड्या प्रमाणात सूर्यापासून ओठांचे संरक्षण करणाराही असावा . 


५. त्यासाठी सन प्रोटेक्टिव्ह एस पी एफ किती आहे हे त्यावर बघावे . एखाद्या व्यक्तीला कॉस्मेटिक बाम वापरायचा नसेल तर , पेट्रोलियम जेली वापरावी . यामुळेही ओठ मुलायम राहतात . 


६. शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राखणे ही गोष्ट उन्हाळ्यात खूप गरजेची असते . त्यामुळे यावर लक्ष केंद्रित करून दिवसातून कमीतकमी अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे . 


७. बहुतेक महिला थोड्याफार प्रमाणात मेकअप करतात . कोणतेही प्रसाधन निवडण्यापूर्वी त्यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत  ना हे बघावे . असे जर एखादे प्रसाधन असेल तर ते  वापरणे त्वरित थांबवावे . 


८. फेसवॉश सौम्य असावा . तीव्र स्वरूपाचे फेसवॉश वापरल्यामुळे त्वचेला आणि प्रामुख्याने ओठांना हानी पोहोचू शकते  . 


९. तुम्ही जर मुरुमांसाठी अथवा अन्य कुठल्या कारणांसाठी फेसवॉश किंवा इतर कुठलेही उत्पादन वापरत असाल तर  त्याच्याशी ओठांचा थेट संपर्क येऊ देऊ नका , अन्यथा त्यामुळे ओठांचे नुकसान होऊ शकते . अशा प्रकारे ओठांची  काळजी घेतील तर कोरड्या ओठांची समस्या भेडसावणार नाही . 

Leave a Comment

en_USEnglish