* नाकाची काळजी कशी घ्यावी *
१ . आजकाल हवेतील प्रदूषणामुळे नाकाच्या विकारामध्ये खूपच वाढ झालेली दिसून येते . नाकावाटे आपण श्वसन करतो आणि त्यातूनच आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी लागणार प्राणवायू आपण शरीरात घेतो आणि शरीरात तयार होणार कार्बनडायऑक्सा इड वायू बाहेर टाकत असतो . त्यामुळे नाक किंवा ज्ञानेद्रीयांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते .
२ . नाक चोंदल्यास कानात कापसाचे बोळे घालावेत . गरम पाण्याच्या पिशवीने कपाळ शेकावे . साजूक तुपाचे थेंब नाकात घातल्यानेही नाक मोकळे होते .
३. अतिउष्णतेमुळे वारंवार सर्दी होण्याचे प्रमाणही वाढते . तीव्रता अधिक असल्यास रुमालावर निलगिरी तेलाचे थेंब टाकून सुंगायला दिल्यास बरे वाटते . उष्णतेमुळे होणारी सर्दी असेल तर , पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे .
४ . या दिवसात नाकामध्ये माळीण होण्याचे प्रमाण वाढते . माळीण म्हणजे नाकपुडीच्या आत होणारे फोड . यामुळे वेदना होतात तसेच श्वसनालाही त्रास होतो . प्रामुख्याने हा उष्णतेचा विकार आहे . साजूक तुपाचा एखादा थेंब रात्री झोपतांना नाकात सोडल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो . अतिउष्णतेमुळे गोळना फुटणे म्हणजे नाकातून अचानक रक्त येण्याची समस्या उद्भवते .
५ . मन खाली करून मस्तकावर आणि कपाळावर गार पाणी मारल्यास रक्त वाहणे थांबते . गादीवर डोके थोडे वरच्या बाजूला कलते करून दोन तीन मिनिटे झोपल्यासही रक्त वाहणे थांबते .
६ . नाक स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करतांना पाण्याने हलकासा हबका मारा .
७ . नाकात कोणतीही वस्तू गेल्यास डॉक्टरांकडे जाऊन ती काढून घ्या .
८ . नाकातून आलेले रक्त प्राथमिक उपचारांनी थांबत नसल्यास डॉक्टरांकडे तातडीने जा .
९ . नाकामध्ये कोणतेही औषधी द्रव्य परस्पर घालू नका .