* पायाच्या भेगा *
१. टाचांना भेगा –
टाचांना भेगा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शिअम आणि स्निग्धतेची कमतरता होय . पायाची त्वचा जाड असते . त्यामुळे शरीरात तयार होणारे सिबम ( तेल ) पायाच्या बाहेरच्या भागांपर्यंत पोहचत नाही . शिवाय पौष्टिक घटक व योग्य स्निग्धता न मिळाल्यामुळे टाचा खडबडीत होतात . व त्यावर भेगा पडू लागतात . टाचांच्या भेगांमुळे आग होणे , दुखणे हा त्रास होतो . शिवाय कधीकधी त्यातून रक्तही येते .
२. त्वचेतील ओलसरपणा कमी झाल्यामुळे तळपायांवर भेगा पडतात .
३. भेगांचा त्रास असा कमी करा :
एक केळ आणि एव्होकॅडोचे फळ एकत्र करून त्याचा लगदा तयार करावा . तळपायांच्या भेगांवर हे मिश्रण लावावे . नंतर १५ मिनिटांनी गरम पाण्याने पाय स्वच्छ धुवावेत . हा उपाय रोज केल्यास पायांवरील भेगा कमी होतील .
४. ऑलिव्ह ऑइल ने पायांना मसाज करून अर्धा तासाने कोमट पाण्याने पाय धुतल्यानेही आराम मिळतो . अशा पध्द्तीने पायांना रोज मालिश केल्यास त्वचेत ओलसर पणा येऊन पाय मुलायम होतील .
५. लिंबामध्ये नैसर्गिक ऍसिड असते . त्यामुळे त्वचा तिच्या नैसर्गिक स्वरूपामध्ये मुलायम होते .
६ . मधामध्ये प्रतिजैविक घटक असतात . चार चमचे लिंबाचा रस , दोन चमचे मध , तसेच एक चमचा ग्लिसरीन एकत्र करून भेगा पडलेल्या जागी लावावे आणि वाळू द्यावे . १५ मिनिटानंतर पाय घासायच्या दगडाने ( प्युमिक स्टोन )पाय स्वच्छ करावेत . त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातील , तसेच पायाचा भेगा कमी होण्यास मदत होईल .
७. अंड्याचा बलक , एक चमचा लिंबाचा रस आणि तांदळाचे पीठ एकत्र करावे . त्यानंतर तळपाय १५ मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवावेत . त्यानंतर पाय कोरडे करून हे मिश्रण तळपायांवर लावावे . वीस मिनिटानंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवावेत . त्यामुळे तळपायाच्या त्वचेला ओलसरपणा मिळून मुलायम पणा येईल .
८. दीड चमचा व्हॅसलिन व एक लहान चमचा बोरिक पावडर चांगल्या प्रकारे कालवा व भेगांवर हा जाड लेप लावा काही दिवसातच फुटलेल्या टाचा भरू लागतील .
९. टाचा जास्तच फुटलेल्या असतील तर मिथिलेटेड स्पिरिटमध्ये कापसाचा बोळा भिजवून फुटलेल्या टाचेवर ठेवा . असे दिवसातून ३-४ वेळा करा त्यामुळे टाचा बऱ्या होऊ लागतील .
१० . कोमट पाण्यात थोडा शाम्पू व एक चमचा सोडा काही थेंब डेटॉल टाका . त्या पाण्यात १० मिनिटे पाय बुडवून ठेवा . त्वचा मऊ झाल्यावर मिथिलेटेड स्पिरिट लावून टाचांना प्युमिक स्टोनने ( पाय घासायच्या दगडाने ) किंवा मऊसर घासणीने घासून तिथली त्वचा साफ करा . त्यामुळे टाचेवरील माती निघून जाईल . नंतर टॉवेलने पुसून कोमट तेलाने मालिश करा .
यामुळे पायांच्या भेगा कमी होतील