* पॅडीक्युअर *

                * पॅडीक्युअर  * 


१. पॅडीक्युअर  एक सोपा प्रकार आहे . त्याला आपण घरी सुध्दा करू शकतो . पण पायाची अवस्था जास्तच खराब असल्यास पॅडीक्युअर चांगल्या ब्युटी स्पेशालिस्टकडून करून घेणे चांगले 


२. पॅडीक्युअरसाठी लागणारे साहित्य :  

छोटा टब , कोमट पाणी , शाम्पू , हायड्रोजन पेरॉकसाईड , नेलपॉलिश , रिमूव्हर , नेलकटर , ऑरेंज स्टिक , क्युटिकल पुशर , नेलं फायलर , प्युमिक स्टोन ,  कोल्ड क्रीम , कापूस व टॉवेल .


३. पॅडीक्युअर करण्याची पध्द्त :

पहिल्यांदा नेलपेंट रिमूव्हरने पायावरची जुनी नेलपेंट काढा . नेलकटरने किंवा छोट्या कात्रीने वाढलेली किंवा वाकडी झालेली नखे कापा . पायाची नखे नेहमी सरळच कापावीत . नेलफायरने नखांना चांगला आकार घावा .


४ . टबात  कोमट पाणी घेऊन त्यात थोडा शाम्पू व एक चमचा हायड्रोजन पेरॉकसाईड टाकून मिसळा किंवा कोमट पाण्यात ३ चमचे मीठ , अर्धा लिंबाचा रस , व एक छोटा चमचा गुलाबपाणी टाकून मिक्स करा . त्यात पाय १० मिनिटे भिजवून ठेवा . त्यामुळे मृत त्वचा ओलसर होते . ८- १० मिनिटानंतर प्युमिक स्टोन ने किंवा घासणीने ( नरम ) घासून  घाण साफ करा . पायापासून मळ  निघाल्यावर स्वच्छ टॉवेलने  पाय पुसा . त्यानंतर पायाच्या नखांवर क्रीम लावून चांगल्या रीतीने मालिश करा . मालिश केल्यावर ऑरेंज स्टिकवर थोडा कापूस लावून नखाच्या आतला मळ साफ करा  . क्युटिकल पुशरच्या साहाय्याने नखाच्या जवळचा भाग आतल्या बाजूला ढकला . त्यामुळे नखाचा आकार  चांगला दिसू लागेल . 


५. पायांवर कोल्ड क्रीमने १० -१५ मिनिटे मालिश करा . त्यामुळे पायाची त्वचा मुलायम होईल . कापसाच्या बोळ्यानी  नखे व त्वचेवर क्रीम पुसून टाका . पॅडीक्युअर  नंतर पायांना धुळ , घाणीपासून वाचावा . आणि कमीतकमी  ४ दिवस मोजे वापरावेत . मोज्यांच्या वापर तुम्ही हिवाळाभरही करू शकतात . 

1 thought on “* पॅडीक्युअर *”

  1. Furthermore, it have to be claimed as much as} seven days after registration, and is topic to 50x wagering requirements and minimum deposits of C$10. Let’s take a closer in-depth} look, starting with JackpotCity’s welcome bundle and different promotions. You can learn to determine wheel bias, vendor bias, and dominant diamond spin patterns. All of these 1xbet things could be learned and mastered with practice.

    Reply

Leave a Comment

en_USEnglish