* मॅनिक्युअर घरच्या घरी कसे करावे *

          * मॅनिक्युअर घरच्या घरी कसे करावे  *


१ . आपला चेहरा नितळ दिसावा यासाठी आपण नेहमी आग्रही असतो . मात्र ,आपण हाता – पायांच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही . त्यामुळे गोरा चेहरा आणि काळवंडलेले हातपाय , अशी विसंगती दिसते . परंतु काही काळजी करू नका तुम्ही घरच्या घरी हात – पायांची काळजी घेऊ शकता . 


२. योग्य सेवा मिळावी म्हणून बहुतेक महिला पार्लरमध्ये जातात . परंतु घरी देखील आपण मॅनीक्युअरच्या साहाय्याने हातापायाची काळजी घेऊ शकतो . 


३. बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावरची त्वचा आणि हाताची त्वचा मॅच होत नाही . अशावेळी आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे असते . त्यासाठी बाहेर जातांना सनकोट किंवा सनस्क्रीन लोशन वापरावे . तसेच महिन्यातून किमान एकदा तरी मॅनिक्युअर करावे . त्यामुळे आपली हाताची त्वचा सुंदर आणि मुलायम दिसते . 


          ४. हाताचा  मसाज कसा करावा :

१. मसाज खालून वरच्या दिशेने करावा . 

२. बोटापासून वरच्या बाजूला एका मागे एक हात गोलाकार फिरवावा . 

३. अंगठ्याला गोलाकार मसाज करावा . 

४. बोटांच्या चांगल्या प्रकारे मसाज झाल्यावर हात मागच्या दिशेने घेऊन मसाज करावा . 

५. मनगटाला गोलाकार मसाज करावा . म्हणजे बॅनगल  स्टेप करावी . नंतर हातांना झटका देऊन हात मोकळे करावे . अशाप्रकारे मॅनिक्युअरची  प्रक्रिया पूर्ण होते . 


   ५. मॅनिक्युअर म्हणजे काय ? . 

– मॅनिक्युअर म्हणजे हाताची स्वच्छता करणे होय . हातांच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात . तळहाताला चिरा पडणे , त्वचा खरखरीत होणे . तसेच हातावर काळे डाग पडणे . त्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे त्याकरिता मॅनिक्युअर करणे गरजेचे असते . 

– मॅनिक्युअर मधील सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे नखांचे सौंदर्य वाढवणे , जसे नखांची स्वच्छता करणे व नखांना आकार  देणे . मॅनिक्युअर साठी  लागणारे साहित्य बाजारात सहज उपलब्ध होतात . 


६. मॅनिक्युअर करण्याची पध्द्त व त्यासाठी लागणारे साहित्य : 

– टॉवेल ,नेल , रिमूव्हर , साबण ,ब्रश नेल -पॉलिश  , शाम्पू , गरम पाणी क्युटिकल रिम्युव्हर  , कापूस , हँडक्रीम . इ  .


७. पध्द्त : 

– प्रथम कापूस व नेलं रिम्युव्हरच्या साहाय्याने आधीची नेलं -पॉलिश  काढून टाकावी . काडीने किंवा स्टिकने नखांच्या कोपऱ्यातील  कलर नीट काढून नखांना आकार द्यावा . 

– मग काडीला कापसाचे आवरण करून नखांच्या अवतीभोवती असलेली जाड स्किनला लावावे , कि त्यामुळे ती जाड स्किन मुलायम  होते , स्किन काढून टाकावी ज्यामुळे नखांची चांगलीप्रकारे वाढ होते . 

– आता गरम पाण्यात शाम्पू व हायड्रोजन पॅराऑक्सिडं टाकून थोडा वेळ म्हणजे २-३ मिनिटे हात पाण्यात बुडवून ठेवावेत . नंतर ते ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करावे . 

– एक एक करून दोन्ही हात स्वच्छ करावे . हँडक्रीम मसाज करावा . क्युटिकलच्या नखांना लावून क्युटिकल कटरच्या साहाय्याने स्वच्छ करावे  . 

Leave a Comment

en_USEnglish